पाकचे पंतप्रधान इम्रानखान यांनी ओकली गरळ , म्हणाले आमचं लष्कर तयार , भारताला धडा शिकविण्याची वेळ

Advertisements
Advertisements
Spread the love

भारताला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. आमचं लष्कर तयार आहे अशी धमकी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिली आहे. पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिवस १४ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. याच दिवसाचे औचित्य साधत इम्रान खान हे पाकव्याप्त काश्मीरमध्ये आले होते. मुझ्झफराबाद या ठिकाणी त्यांनी भाषण केले. त्या भाषणात त्यांनी भाजपावर निशाणा साधला. भाजपा आणि नरेंद्र मोदी यांचा खरा चेहरा समोर आला आहे. पाकिस्तानची लढाई एका विचारधारेविरोधात आहे. ही विचारधारा भयंकर आहे असं म्हणत त्यांनी भाजपावर आणि नरेंद्र मोदींवर टीका केली. काश्मीरमध्ये अनुच्छेद ३७० रद्द करण्याचा निर्णय भारताला महागात पडणार आहे. सध्या काश्मीरमध्ये काय सुरु आहे याची कल्पना कुणालाही नव्हती. मात्र आता सगळ्या जगाचं लक्ष काश्मीरकडे लागलं आहे. आता काश्मीरमध्ये काय घडतं आहे ते पाहाच असंही इम्रान खान यांनी म्हटलं आहे.

Advertisements

आरएसएसची विचारधारा महाभयंकर आहे हे जगाला ठाऊक नाही. उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री काय म्हणतात? मुस्लीम महिलांना कबरीतून बाहेर काढून बलात्कार करु. मुख्यमंत्रीपदी बसणारा माणूस असं वक्तव्य कसं काय करु शकतो? काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर महिलांबाबत कशी वक्तव्यं समोर येत आहेत ते पाहा म्हणजे यांचे विचार किती सडके आहेत हे लक्षात आहे. भारत सहिष्णू देश समजला जात होता, मात्र सध्या जी विचारधारा आणि जे सरकार सत्तेत आहे त्यामुळे सर्वात जास्त नुकसान हे भारताचं होणार आहे असंही इम्रान खान म्हणत आहे. मोदी सरकारने घटना संपवली, सुप्रीम कोर्टाचा अपमान केला. त्यामुळे भारत आता अधोगतीच्या दिशेने वाटचाल करतो आहे असेही त्यांनी म्हटलं आहे.

Advertisements
Advertisements

सध्या आपल्यासमोर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भयंकर अशी विचारधारा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लहानपणापासूनच या संघाशी जोडले गेले आहेत. आरएसएसचा जन्म हा हिटलरच्या विचारधारेतून झाला आहे. हिंदू सर्वश्रेष्ठ आहेत आणि आपल्याला मुस्लिमांचा बदला घ्यायचा आहे हेच या विचारधारेचं मूळ आहे. मुस्लिमांविरोधात यांच्या मनात तिरस्काराचं बीज रोवलं गेलं आहे. फक्त मुस्लीमच नाही हे ख्रिश्चनांचाही निषेधच करतात. जर मुस्लीम किंवा ख्रिश्चन नसते तर हिंदू धर्म जगात श्रेष्ठ ठरला असता हे संघाची विचारधारा सांगते. तसेच मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्माला हे लोक तुच्छ लेखतात असेही इम्रान खान यांनी म्हटले आहे.

एकदा संघाची विचारधारा लक्षात घ्या त्यामुळेच लक्षात येते की फाळणी का झाली? पाकिस्तानची निर्मिती का झाली? त्यासगळ्यामागे हीच विचारधारा होती असंही इम्रान खान यांनी म्हटलं आहे. तसेच याच विचारधारेच्या माणसाने महात्मा गांधींचा खून केला असंही इम्रान खान आहे. अनुच्छेद ३७० रद्द करणं हे या विचारधारेचं कार्ड नरेंद्र मोदी यांनी खेळलं आहे असाही आरोप इम्रान खान यांनी केला आहे. काश्मीरमध्ये जे पाऊल उचललं गेलं ते निंदनीय आहे. संचारबंदी उठल्यावरच आपल्याला काय घडलं ते समजू शकेल. अनुच्छेद ३७० रद्द करायचं होतं तर काश्मीरमध्ये संचारबंदी का लागू केली? पर्यटकांना बाहेर का काढलं? एवढा फौजफाटा का तैनात केला? हे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले आहे.

आपलं सरकार