Maharashtra : अविनाश आघाव , श्रद्धा वायदंडे यांच्यासह राज्यातील ११ पोलीस अधिकाऱ्यांचा केंद्रीय गृह खात्याकडून गौरव

Advertisements
Advertisements
Spread the love

उत्कृष्ट तपास व शोधकार्यासाठी देण्यात येणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री पदकाने देशातील ९६ तपास अधिकाऱ्यांचा गौरव झाला असून त्यात महाराष्ट्रातील ११ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. गुन्हे तपासातील कौशल्याचा सन्मान व्हावा व तपासाचा दर्जा उंचावण्यासाठी गेल्यावर्षीपासून या पदकांची सुरुवात करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री पदकविजेत्यांमध्ये सीबीआयचे १५ तपास अधिकारी, महाराष्ट्र पोलीस दलातील ११ अधिकारी, उत्तर प्रदेश पोलीस दलातील १० अधिकारी, केरळ पोलीस दलातील ९ अधिकारी, मध्य प्रदेश पोलीस दलातील ८ अधिकारी, दिल्ली व कर्नाटक पोलीस दलातील ६ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यात १३ महिला पोलीस अधिकाऱ्यांनीही बाजी मारली आहे.

Advertisements

महाराष्ट्रातील पदकविजेते अधिकारी

Advertisements
Advertisements

१. अविनाश लक्ष्मीकांत आघाव (पोलीस निरीक्षक)
२. श्रद्धा अशोक वायदंडे (सहायक पोलीस निरीक्षक)
३. सुरेश नानाभाऊ रोकडे (पोलीस निरीक्षक)
४. प्रदीप विजय भानुशाली (पोलीस निरीक्षक)
५. प्रशांत श्रीराम अमृतकर (पोलीस उपअधीक्षक)
६. हेमंत सुभाष पाटील (पोलीस निरीक्षक)
७. प्रियांका महेश शेळके (सहायक पोलीस निरीक्षक)
८. सागर जगन्नाथ शिवलकर (पोलीस निरीक्षक)
९. संजय देवराम निकुंबे (पोलीस निरीक्षक)
१०. सुधाकर दत्तू देशमुख (पोलीस निरीक्षक)
११. सचिन सदाशिव माने (सहायक पोलीस निरीक्षक)

आपलं सरकार