Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : दोन जणांनी मारहाण करीत वृध्दास लुटले तर दुसऱ्या घटनेत रोड रोमियोंची वृद्धास मारहाण

Spread the love

भाजी विक्रेत्याचा प्रामाणिकपणा, ग्राहकाचे पाकीट केले परत

औरंंंगाबाद : शहागंज भाजीमंडईत भाजीपाला खरेदी करण्यासाठी गेलेल्या कामगाराचे पैशांचे पाकिट भाजी विक्रेत्याने प्रामाणिकपणे परत केले. हा प्रकार ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी घडला. सुरेश देवचंद जगताप (रा. जिजाऊनगर, सिडको, वाळुज महानगर) हे भाजीपाला खरेदीसाठी दुपारी दिडच्या सुमारास शहागंजातील भाजी मंडईत गेले होते. कांदे खरेदी करताना त्यांचे २० हजार पाचशे रुपये, आधारकार्ड, पॅन कार्ड आणि एटीएम कार्ड असलेले पाकिट भाजी विक्रेत्याच्या गाडीवर विसरुन राहिले. मात्र, भाजीपाला खरेदी केल्यानंतर पाकिट चोरीला गेले की, काय म्हणत त्यांनी थेट सिटीचौक पोलिस ठाणे गाठले. पोलिसात पाकिट चोरीला गेल्याची तक्रार दिल्यानंतर ते पुन्हा भाजी मंडईत ज्या-ज्या ठिकाणाहून भाजीपाला खरेदी केला. त्याठिकाणी पाहणी करण्यासाठी गेले. तेव्हा एका भाजी विक्रेत्याने प्रामाणिकपणे त्यांना विसरुन राहिलेले पाकिट परत केले. अशी माहिती सिटीचौक पोलिस ठाण्याचे जमादार के. टी. माने यांनी दिली.


दोन जणांनी मारहाण करीत वृध्दास लुटले

औरंंंगाबाद : दोन जणांनी मारहाण करीत गिरधारीलाल धन्नुलाल कटारिया (वय ६५, रा.शास्त्रीनगर, सिल्लोड, ह.मु. मनोहर क्लॉथ स्टोअर्स, शहागंज) यांना लुटल्याची घटना १२ ऑगस्ट रोजी रात्री दिड वाजेच्या सुमारास घडली.  गिरधारीलाल कटारीया हे शहागंज येथील मनोहर क्लॉथ स्टोअर्सजवळ झोपले असता शोएब खान युनूस खान (वय २१,रा.चंपाचौक), अनिस खान शवूâर खान (वय ३५,रा.किराडपुरा) यांनी कटारीया यांना मारहाण करीत त्यांच्या खिशातील रोख रक्कम रूपये ३ हजार ५२८ रूपये बळजबरीने हिसकावून घेतले. याप्रकरणी गिरधारीलाल कटारिया यांनी दिलेल्या तक्रारीवरून दोघाविरूध्द सिटीचौक पोलिस ठाण्यात लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक पाटे करीत आहेत

टोळक्याने केली वृध्दास मारहाण

औरंंंगाबाद : रस्त्याने येणा-या-जाणा-या मुलींची व महिलांची छेड काढणा-यांना जाब विचारल्याच्या कारणावरून सात ते आठ जणांच्या टोळक्याने किशन बन्सीलाल सलामपुरे (वय ६५, रा.कोतवालपूरा, खडकेश्वर) यांना शिवीगाळ करून मारहाण केली. ही घटना १२ ऑगस्ट रोजी दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास घडली. किशन सलामपुरे यांच्या तक्रारीवरून विरेंद्र राजेंद्र बनसोड याच्यासह ७ जणाविरूध्द क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक अनिता बागुल करीत आहेत.

चाकूचा  धाक दाखवून युवकास लुटले

औरंंंगाबाद : लोडींग रिक्षामध्ये भाजीपाला घेवून नेवासा येथून औरंगाबादकडे येत असलेल्या शरद शिवाजी कनगरे (वय ३३, रा.अमंळनेर, ता.नेवासा) याला रिक्षातून आलेल्या तीन जणांनी चावूâचा धाक दाखवून लुटले. ही घटना ११ ऑगस्ट रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास लिंबेजळगांव येथील हॉटेल वृंदावन समोर घडली. रिक्षातून आलेल्या तीन लुटारूंनी शरद कनगरे याच्या लोडींग रिक्षासमोर रिक्षा आडवी लावून कनगरे याच्या खिशातील ५ हजार रूपये विंâमतीचा मोबाईल व रोख रक्कम ७०० रूपये असा एकूण  ५ हजार ७०० रूपयांचा ऐवज हिसकावून नेला. याप्रकरणी वाळुज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक उंबरे करीत आहेत.

वाळूजमध्ये शेतक-याचे घर फोडून ९० हजाराचा ऐवज लंपास

औरंंंगाबाद : आपल्या कुटुंबियासोबत शेतात कामासाठी गेलेल्या शेतकNयाचे घर फोडून चोरट्यांनी ९० हजाराचा ऐवज लंपास केला. रावसाहेब पांडूरंग पेहरकर (वय ३०, रा.येसगाव, ता.गंगापूर) हे ११ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता कुटुंबियासोबत शेतात कामासाठी गेले होते. चोरट्यांनी पेहरकर यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील सामान उचकटून टाकत कपाटातील सोने-चांदीचे दागीने व रोख रक्कम असा एवूâण ९० हजाराचा ऐवज चोरून नेला. सायंकाळी ६ वाजता रावसाहेब पेहरकर घरी आल्यावर चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी वाळुज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक उंबरे करीत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!