It seems you're using an unsafe, out-of-date browser. CLOSE(X)

Aurangabad : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर संशयीतांची झाडा-झडती, रेल्वेस्टेशन, बसस्थानकावर पोलिसांचे विशेष लक्ष

Spread the love

प्रवाशासोबत सौजन्याने वागण्याच्या कर्मचा-यांना सुचना
रेल्वेस्टेशन, बसस्थानक येथे प्रवाशांच्या बॅगा चेक करत असतांना पोलिस कर्मचा-यांनी सौजन्याने वागावे, प्रवाशासोबत अरेरावी करू नये अशा सुचना पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिल्या आहेत. तसेच प्रवाशांच्या बॅगा चेक करीत असतांना त्याचे संपुर्ण व्हीडीओ चित्रीकरण करण्यासाठी प्रत्येक पथकासोबत एक व्हीडीओ फोटोग्राफर देण्यात आला असल्याचे सावंत यांनी सांगितले.


औरंंंगाबाद : भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा येत्या गुरूवारी (दि.१५) मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या सोहळ्याला कोणतेही गालबोट लागू नये यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने खबरदारी घेण्यात येत आहे. गुन्हेशाखा, विशेष शाखा, दंगा नियंत्रण पथक, पोलिस स्टेशनचे कर्मचारी, पोलिस मुख्यालयातील कर्मचारी मिळून ८ पथके तैनात करण्यात आली असून ही पथके रेल्वेस्टेशन, मध्यवर्ती बसस्थानक, सिडको बसस्थानक येथे संशयीतांची झाडा-झडती घेत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत यांनी मंगळवारी (दि.१३) दिली.

गेल्या आठवड्यात केंद्र  शासनाने जम्मू काश्मीरचे विभाजन करीत कलम ३७० आणि कलम ३५ (अ) हटविल्यानंतर देशभरात सर्वत्र अलर्ट जारी करण्यात आला आहे. स्वातंत्र्यदिन सोहळा निर्विग्नपणे पार पाडण्यासाठी पोलिस यंत्रणेसह गुप्तचर यंत्रणा सक्रीय झाली आहे. पोलिस आयुक्तालयाच्या वतीने ८ पथके तैनात करण्यात आली आहेत. त्यापैकी २ पथके रेल्वेस्टेशन, २ पथके मध्यवर्ती बसस्थानकात, २ पथके सिडको बसस्थानक परिसरात येणा-या जाणा-या संशयीत प्रवाशांची झाडा-झडती घेत आहे. तर १ पथक मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील लॉजची तपासणी करीत आहे. तर दुसरे पथक रेल्वेस्टेशन परिसरातील लॉजची तपासणी करीत असल्याचे सावंत यांनी सांगितले.
दरम्यान, शहरातील चिकलठाणा विमानतळ प्रोझोन मॉल, रिलायन्स मॉल, डी-मार्ट मॉल, चित्रपटगृहे आदींची दररोज श्वानपथक आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या वतीने तपासणी करण्यात येत आहे. तसेच शहरातील बाजारपेठेत होणाNया संशयीत हलचालीवर देखील पोलिसांचे लक्ष असल्याचे पोलिस निरीक्षक सावंत यांनी यावेळी सांगितले.

पूरग्रस्तांसाठी गुन्हे शाखेने उचलला खारीचा वाटा

कोल्हापूर आणि सांगली येथील पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी शहरातील विविध स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक संघटनांच्या वतीने मदतीचा ओघ सुरू झाला आहे. पुरग्रस्तांना मदत व्हावी यासाठी गुन्हे शाखेतील अधिकारी व कर्मचा-यांनी मिळून २५ ते ३० हजार रूपयांचा निधी जमा करून पोलिस आयुक्तांकडे  सुपुर्द केला आहे. पोलिस आयुक्तालयाच्या वतीने लवकरच निधी जमा करून तो मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केला जाणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत यांनी दिली आहे.

Leave a Review or Comment