Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : सोलार प्लॅन्टचे आमिष दाखवून ४ लाखांची फसवणूक

Spread the love

औरंंंगाबाद : सोलार प्लॅन्ट योजनेचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून ४ जणांनी पद्या देविदास रगडे (वय ५५, रा.संजयनगर, मुुवुंâदवाडी) यांची ४ लाख १२ हजार २०० रूपयांची फसवणूक केली. धनंजय लेले, ऋतुजा देशपांडे, भारगावकर, गुप्ता यांनी पद्या रगडे यांना सोलार प्लॅन्ट योजनेचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखविले. रगडे यांच्याकडून भामट्यांनी १५ मार्च ते १० ऑगस्ट २०१९ दरम्यान ४ लाख १२ हजार २०० रूपये घेतले होते. परंतु योजनेचा लाभ मिळवून न देता चौघांनी रगडे यांची फसवणूक केली. याप्रकरणी रगडे यांच्या तक्रारीवरून फसवणूक करणा-या चौघाविरूध्द मुकुंदवाडी  पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.

बेगमपु-यातील जुगार अड्यावर पोलिसांचा छापा

औरंंंगाबाद : पत्यावर पैसे लावून तिर्रट नावाचा जुगार सुरू असलेल्या जुगार अड्यावर बेगमपुरा पोलिसांनी १२ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास छापा मारला. पहाडसिंगपुNयातील मल्लाव समाज मंदिर येथे तिर्रट नावाचा जुगार खेळणाNया गंगाधर दशरथ सलामपुरे (वय ४५), जितेन तुळजाराम सलामपुरे, संतोष शांतीलाल बिरोटे, राजू माणिकराव घल्डे, कान्होबा धोंडूजी भोणे, धन्नूलाल सांडू सलामपुरे, संजय रामभाऊ ढवण असे जुगा-यांची नावे आहेत. जुगाNयांच्या ताब्यातून पोलिसांनी जुगारासाठी लागणारे साहित्य, रोख रक्कम ४ हजार १५० रूपये, ३४ हजार रूपये विंâमतीचे ७ मोबाईल असा एवूâण ३८ हजार १५० रूपये विंâमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस उपनिरीक्षक संतोष कुकलारे यांच्या तक्रारीवरून जुगाNयांविरूध्द बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जमादार दिवटे करीत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!