Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Jammu and Kashmir : भाजपवरुन महेबुबा आणि ओमर अब्दुल्ला यांच्यात तू -तू मैं- मैं , पोलिसांनी केले दोघांनाही वेगळे !!

Spread the love

भाजपला जम्मू-काश्मीरच्या राजकारणात शिरकाव करू दिल्याच्या मुद्द्यावरून नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला आणि पीडीपीच्या नेत्या महबूबा मुफ्ती यांच्यात वादाची ठिणगी पडली. कलम ३७० हटवल्यानंतर गेल्या आठवड्यात या दोन्ही नेत्यांना हरि निवास महल येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे. मात्र त्यांच्यात तेथे भांडण सुरू झाले आणि ते इतके विकोपाला गेले की अब्दुल्ला यांना तेथून अन्यत्र हलवण्यात आले.

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री असलेले अब्दुल्ला आणि महबूबा मुफ्ती गेल्या आठवड्यापासून नजरकैदेत आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये भाजपला कोणी आणलं या मुद्द्यावरून त्यांच्यात वाद झडला. तेव्हा महबूबा यांचे वडील दिवंगत मुफ्ती मोहम्मद सईद यांनी २०१५ आणि २०१८ मध्ये सत्तेसाठी भाजपशी हातमिळवणी केली होती, या मुद्द्यावरून अब्दुल्ला यांनी महबूबा यांना डिवचलं. दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक फैरी झडल्या, अशी माहिती हॉस्पिटॅलिटी आणि प्रोटोकॉल विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. भांडणाचा आवाज तेथील कर्मचाऱ्यांनीही ऐकला.

महबूबा यांनी अब्दुल्ला यांना प्रत्युत्तर केलं. अब्दुल्ला यांचे वडील फारुख अब्दुल्ला यांनीही अटल बिहारी वाजपेयी सरकारसोबत एनडीएत जाणं पसंत केलं होतं. दोघांमध्ये भांडण झाल्यामुळे अखेर ओमर अब्दुल्ला यांना महादेव पहाडीजवळ चष्माशाही येथे वन विभाग भवनात हलवण्यात आले आहे. हरि निवासत दोघंही वेगवेगळ्या मजल्यांवर होते. दोघांनाही त्याच्या पदांनुसार आणि तुरुंगाच्या नियमानुसार जेवण दिले जात आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!