Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

जम्मू काश्मीर मध्ये बकरी ईद शांततेत, काही भागात संचारबंदी शिथिल, ईदनिमित्त शासनाकडून विशेष व्यवस्था

Spread the love

आठवडाभरापासून कडेकोट बंदोबस्तात असणाऱ्या जम्मू-काश्मीरमध्ये आज, सोमवारी होत असलेल्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर, रविवारी निर्बंध शिथिल करण्यात आले होते. सरकारकडूनही ईदच्या दृष्टिकोनातून बँका-एटीएमपासून बकऱ्यांच्या उपलब्धतेपर्यंत काळजी घेतली होती. त्यामुळे विविध भागांमधील बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी दिसून येत होती. दरम्यान, श्रीनगरच्या काही भागांमध्ये पुन्हा जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

केंद्र सरकारने सोमवारी संसदेत विधेयक मांडत ३७०वे कलम हटविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याआधीपासूनच जम्मू-काश्मीरमधील बंदोबस्त वाढविण्यात आला होता. गेल्या आठवड्यामध्येही विविध भागांमध्ये निर्बंध लादण्यात आले होते. सर्वत्र सोमवारी बकरी साजरी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर, सरकारने रविवारी तेथील निर्बंध काही प्रमाणात शिथिल केले होते. काश्मीर खोऱ्यामध्ये नागरिकांना मशिदीमध्ये ईदची नमाज अदा करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच, मोबाइल व इंटरनेटवरील निर्बंध लवकरात लवकर शिथिल करण्यात येतील, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. रविवार असून, बँका व बाजारपेठा खुल्या करण्यात आल्या होत्या. एटीएममध्ये पुरेशा प्रमाणात रोकड उपलब्ध करून देण्यात आली होती. बकरी ईद पारंपरिक उत्साहात साजरी करण्यासाठी २.५ लाख बकरे उपलब्ध करून देण्यात आले होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. याशिवाय, भाज्या, एलपीजी सिलिंडर, कोंबड्या व अंडी नागरिकांपर्यंत उपलब्ध व्हावीत, यासाठी या गोष्टी वाहनांमधून नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहेत.

गेल्या सहा दिवसांमध्ये काश्मीर खोऱ्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराची नोंद झाली नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच, जम्मू विभागातील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे, पाच जिल्ह्यांतील जमावबंदी पूर्णपणे मागे घेण्यात आली असून, पाच जिल्ह्यांतील निर्बंथ शिथिल करण्यात आले आहेत. ‘श्रीनगरमध्ये शांतता असून, सावर्जनिक जनजीवन आणि वाहतुकीमध्ये सुधारणा होत आहे,’ श्रीनगरचे पोलिस उपायुक्त शाहीद इक्बाल चौधरी यांनी सांगितले.

– हजवरून येणाऱ्या भाविकांची विमाने १८ ऑगस्टला परतणार असून, त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

– देशाच्या अन्य भागातील नातेवाइकांबरोबर संपर्क साधण्यासाठी ३०० विशेष टेलिफोन बुथ तयार करण्यात आले आहेत.

– महत्त्वाच्या ठिकाणी नागरिकांना सहाय करण्यासाठी न्यायदंडाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी सरकारकडून जीवनावश्यक वस्तूंचा पुरेशा प्रमाणात साठा करण्यात आला आहे. यामध्ये ५५ दिवसांपर्यंत पुरेल एवढ्या तांदळाचा साठा आहे. याशिवाय, १७ दिवस पुरेल एवढे मटण, एक महिन्यांपर्यंतची कुकुटउत्पादने, ३५ दिवसांपर्यंतचे केरोसीन यांचा साठा आहे. तर, एलपीजीचा साठा एक महिने, पेट्रोल-डिझेलचा साठा २८ दिवसांपर्यंत पुरेल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!