It seems you're using an unsafe, out-of-date browser. CLOSE(X)

पत्नीचे शिर हातात घेऊन फिरला आणि पोलीस ठाण्यात स्वत:च हजर झाला !!

Spread the love

पतीने पत्नीची हत्या करत शीर कापल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे ही घटना घडली आहे. आरोपी पत्नीचं कापलेलं शीर हातात घेऊन रस्त्यावर फिरत होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपीला पाहून रस्त्यावरुन चालणारे लोक प्रचंड घाबरले होते आणि पळापळही सुरु झाली होती असं पोलिसांनी सांगितलं आहे. आरोपीने पोलिसांकडे आत्मसर्पण केल्यानंतर अटक करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “आरोपी प्रदीप याने चाकूने पत्नी मनीक्रांतीचा गळा कापून हत्या केली. यानंतर त्याने शीर धडापासून वेगळं केल. हे शीर हातात घेऊन तो रस्त्यावर चालत होता. यावेळी त्याच्या दुसऱ्या हातात चाकू होता”. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता. एका कॉलनीतील या सीसीटीव्हीत लोक प्रचंड घाबरुन धावपळ करत असल्याचं दिसत आहे.

आरोपी प्रदीपने एका कालव्यात शीर फेकलं आणि पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केलं. पोलीस कालव्यात शोध घेत असून मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे अशी माहिती पोलिस उपायुक्त विजय राव यांनी दिली आहे. प्राथमिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीपचा पाच वर्षांपूर्वी मनीक्रांतीसोबत प्रेमविवाह झाला होता. पण अनेकदा त्यांच्या भांडण होत होती.

पत्नीने पोलीस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रारही दाखल केली होती. यानंतर प्रदीपला अटक धझाली होती. जामिनावर सुटका झाल्यानंतर प्रदीपने बदला घेण्यासाठी हत्या केली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Leave a Review or Comment