Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : अपघाताचा बहाणा करून लुटमारी करणारे दोघे गजाआड

Spread the love

 

अपघात झाल्याचा बहाणा करून डोमीनोज पिझ्झाच्या डिलेव्हरी बॉयला शस्त्राचा धाक दाखवून लुटणा-या दोन जणांना क्रांतीचौक पोलिसांनी गजाआड केले. शेख शहेबाज शेख फारूख (वय २१), शेख समीर शेख बाबू (वय २२) दोघे राहणार संजयनगर बायजीपुरा अशी लुटमारी करणा-यांची नावे आहेत.
गणेश महादेव घुगे (वय २५, रा.मालेगाव, जि.वाशिम, ह.मु.समतानगर) हे ११ ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पिझ्झा डिलेव्हरीचे काम संपवून आपल्या मित्रासोबत घरी जात होते. त्यावेळी क्रांतीचौकातील सहनिबंधक कार्यालयासमोर शेख शहेबाज व शेख समीर यांनी अडवून आमचा अपघात झाला असून दवाखान्यात घेवून चला असे म्हणत एक जण घुगे यांच्या दुचाकीवर बसला तर दुस-या युवकाच्या दुचाकीवर घुगे यांच्या मित्राला बसविण्यात आले. त्यांनतर घुगे यांना व त्यांच्या मित्राला मोंढा नाका चौकातून जिन्सीकडे जाणा-या रस्त्यावर नेवून शेख शहेबाज व शेख समीर यांनी घुगे व त्यांच्या मित्राला फायटरचा धाक दाखवून त्यांच्याजवळील रोख रक्कम १ हजार ७०० रूपये व तीन मोबाईल हिसकावून घेवून पोबारा केला होता.
याप्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यावर डीबी पथकाचे सहाय्यक निरीक्षक राहुल सुर्यतळ, सहाय्यक फौजदार नसीम खान, जमादार सय्यद सलीम, राजेश फिरंगे, मिलिंद भंडारे, वानखेडे, संतोष रेड्डी, मंगेश मनोरे, राजेश चव्हाण, हनुमंत चाळणेवाड आदींच्या पथकाने दोघांचा शोध घेवून गजाआड केले. चौकशी दरम्यान, दोघांनी तीन ते चार जणांना शस्त्राचा धाक दाखवून लुटले असल्याची कबूली दिली. सहाय्यक पोलिस आयुक्त हनुमंत भापकर, पोलिस निरीक्षक उत्तम मुळक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक राहुल सुर्यतळ यांच्या पथकाने ही कारवाई केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!