Aurangabad Crime : तोतया डॉक्टरने वृध्द शेतक-यास 17 हजाराला गंडविले

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंंंगाबाद : आतापर्यंत तोतया पोलिसांनी अथवा तोतया सीआयडी पोलिसांनी अनेकांना गंडा घातल्याच्या घटना घडल्या आहेत. परंतु जालना रोडने पायी जात असलेल्या ६७ वर्षीय वृध्द शेतक-यास चक्क एका तोतया डॉक्टरने गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.
भोकरदन तालुक्यातील सुरगळी गावचे रहिवासी असलेले भीमराव नाथा गवळी (वय ६७) हे १० ऑगस्ट रोजी काही कामानिमित्ताने औरंगाबादला आले होते. सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास भीमराव गवळी हे महावीर चौकातून सतीश मोटर्स चौकाकडे पायी जात होते. एबीसी कॉम्पलेक्स समोर त्यांना एका अनोळखी व्यक्तीने अडविले. मी डॉक्टर असून तुमची तपासणी करायची असल्याचे सांगितले. त्यानंतर तोतया डॉक्टरने भीमराव गवळी यांना पगारीया ऑटोसमोर नेले, व तुमच्या खिशातील पुड्या-पाड्या काढुन द्या असे म्हणत त्यांची अंगझडती घेतली.
दरम्यान, भीमराव गवळी यांचे लक्ष नसल्याची संधी साधुन भामट्याने गवळी यांच्या पॅन्टच्या खिशातून रोख १७ हजार रूपये काढुन घेवून पोबारा केला. हा प्रकार लक्षात आल्यावर गवळी यांनी क्रांतीचौक पोलिस ठाणे गाठुन दिलेल्या तक्रारीवरून भामट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक राऊत करीत आहेत.

Advertisements

आपलं सरकार