Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad : गावठी पिस्तूल बाळगणा-याविरुद्ध ग्रामीण पोलिसांची कारवाई

Spread the love

ग्रामीण गुन्हे शाखेची कारवाई

औरंंंगाबाद : गावठी पिस्टल बाळगणा-यास ग्रामीण गुन्हे शाखा पोलिसांनी सोमवारी (दि.१२) गजाआड केले. पोलिसांनी गावठी पिस्टलसह तीन जिवंत काडतूसे जप्त केली असल्याची माहिती ग्रामीण गुन्हे शाखेचे निरीक्षक भागवत पुंâदे यांनी दिली. चरणसिंग शामसिंग काकरवाल (रा.कृष्णापूर, ता.पुâलंब्री) असे गावठी पिस्टल बाळगणा-याचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पुâलंब्री तालुक्यातील कृष्णापूर येथे राहणा-या चरणसिंग काकरवाल याच्याकडे गावठी पिस्टल असल्याची माहिती ग्रामीण गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे ग्रामीण गुन्हे शाखेचे निरीक्षक भागवत पुंâदे, उपनिरीक्षक संदीप सोळुंके, जमादार विठ्ठल राख, श्रीमंत भालेराव, धीरज जाधव, दिपेश नागझरे, रामेश्वर धापसे, रमेश सोनवणे आदींच्या पथकाने चरणसिंग काकरवाल याच्या घरी सोमवारी सकाळी छापा मारला. पोलिसांीन घराची झडती घेतली असता पार्कींगमध्ये पडून असलेल्या वाळूच्या ढिगा-यात एका प्लास्टीकच्या वॅâरीबॅगमध्ये गावठी पिस्टल व तीन जिवंत काडतूसे पोलिसांना मिळून आले.
याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक संदीप साळुंके यांनी दिलेल्या तक्रारीवरून चरणसिंग काकरवाल याच्याविरूध्द पुâलंब्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामीण पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, अप्पर अधीक्षक गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण गुन्हे शाखा पोलिसांनी ही कारवाई केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!