बाॅसच्या पत्नीला मैत्रीच्या जाळ्यात ओढून ब्लॅकमेल करणारा गजाआड

Advertisements
Advertisements
Spread the love

बॉसच्या पत्नीला ब्लॅकमेल करणाऱ्या ३७ वर्षीय आरोपीला मुंबई पोलिसांनी बेडया ठोकल्या आहेत. आरोपीचे बॉसच्या पत्नीबरोबर प्रेमसंबंध होते. नवऱ्याला प्रेमसंबंधांबद्दल सर्व काही सांगेन अशी धमकी देऊन आरोपीने महिलेकडून आतापर्यंत २.२५ लाख रुपये उकळल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपी मूळचा गुजरातचा असून महिलेने तक्रार नोंदवल्यानंतर शुक्रवारी त्याला अटक करण्यात आली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

Advertisements

आपले आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्याचा आरोप महिलेने केला आहे. आरोपीला याआधी गुजरातमध्ये बलात्काराच्या आरोपाखाली अटक झाली होती अशी माहिती पोलिसांनी दिली. जामीन मिळाल्यानंतर आरोपी ओळख बदलून मुंबईत स्थायिक झाला. त्याने तक्रारदार महिलेच्या पतीच्या कंपनीत नोकरी मिळवली.

Advertisements
Advertisements

मागच्या काही महिन्यांपासून तो महिलेला ब्लॅकमेल करत होता असे विलेपार्ले पोलिसांनी सांगितले. मैत्रीचा प्रस्ताव स्वीकारला नाही तर स्वत:चे जीवन संपवण्याची धमकी दिली व मला मैत्री करायला भाग पाडले असे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. सुरुवातीला तो महिलेचा पाठलाग करायचा व आपण तुझ्याबद्दल किती गंभीर आहोत हे त्याने दाखवून दिले. नंतर त्याने त्याच्याजवळ असलेल्या आक्षेपार्ह फोटोंवरुन महिलेला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली.

आपलं सरकार