Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Jammu and Kashmir 370 : ईदनिमित्त शासनाकडून आवश्यक त्या पदार्थांची घरपोच सेवा

Spread the love

राज्यघटनेतील कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील तणाव कमी करण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत. प्रशासनाच्यावतीने नागरिकांसाठी जीवनाश्यक खाद्यपदार्थ घरपोच दिले जात असून यात भाजी, अंडी, चिकन, एलपीजी गॅस आदीचाही समावेश आहे. काश्मीरमधील रेशनिंग व्यवस्थेच्या मार्फत हे घरपोच वितरण करण्यात येत आहे.

ईदच्या निमित्ताने जम्मू-काश्मीर प्रशासन नागरिकांशी संवाद साधून तणाव कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. सामान्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सरकारजवळ ६५ दिवस पुरतील एवढे गहू, ५५ दिवस पुरतील एवढे तांदूळ, १७ दिवस पुरतील एवढे मटण, एक महिने पुरतील एवढे चिकन, ३५ दिवसांचे केरोसिन. एक महिन्याचे एलपीजी आणि २८ दिवस पुरतील एवढा पेट्रोल-डिझेलचा साठा आहे.

ईदच्या निमित्ताने जवळपास ३०० टेलिफोन बूथ लावण्यात आले असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाने दिली. या बूथच्या मार्फत नागरिकांना आपल्या नातेवाईकांना शुभेच्छा देता येणार आहेत. त्याशिवाय अलीगड, दिल्लीसह अन्य काही ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना काश्मीर खोऱ्यात राहणाऱ्या आपल्या कुटुंबाशी संवाद साधण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.

दरम्यान, राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राज्यातील नागरिकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!