Bollywood : सिनेअभिनेत्री विद्या सिन्हा रुग्णालयात, प्रकृती स्थिर

Advertisements
Advertisements
Spread the love

बाॅलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री विद्या सिन्हा यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना जुहू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. विद्या यांना हृदय आणि फुफुस्साचा त्रास झाल्यानं त्यांना दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात आणण्यात आलं होतं. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले.

Advertisements

विद्या यांचं वय ७२ असून त्यांना काही वर्षांपासून फुफुस्सं आणि हृदयासंबंधित आजारांने ग्रासलं होतं. विद्या यांचं हृदय कमकुवत झाल्यानं डॉक्टरांनी यांची अँजिओप्लास्टी करण्याचा सल्ला दिलाय. मात्र, त्यांच्या नातेवाईंकानी अँजिओप्लास्टी करण्यास नकार दिला आहे.

Advertisements
Advertisements

‘छोटी सी बात’, ‘रजनीगंधा’, ‘पती, पत्नी और वो’ या सुपरहिट चित्रपटात त्यांनी काम केलंय. काव्यांजली, कुल्फी कुमार बाजेवाला या टी.व्ही मालिकांमध्येही त्या झळकल्या आहेत.

आपलं सरकार