Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad : कुर्बानीसाठी आणलेले गोवंश पोलिसांनी केले जप्त शहागंज भागात तणाव

Spread the love

औरंंंगाबाद शहरात बकरी ईदनिमित्त कुरबानी देण्यासाठी आणलेले गोवंश पोलिसांनी कारवाई करीत शनिवारी (दि.१०) जप्त केले. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे शहागंज भागात जनावरे विक्री करण्यासाठी आणलेल्या विव्रेâत्यात एकच खळबळ उडाली होती. यावेळी पोलिस आणि विव्रेâत्यांमध्ये वाद झाल्याने शहागंज भागात काही काळ तणाव निर्माण झाला होता. गोवंश विक्रीसाठी आणणाNयाविरूध्द सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
येत्या सोमवारी (दि.१०) मुस्लिम समाज बांधवांचा बकरी ईद हा सण साजरा केला जाणार आहे. बकरी ईदनिमित्त मुस्लिम समाज बांधव बकNयाची कुरबानी देतात. बकरी ईद हा सण अवघ्या दोन दिवसावर येवून ठेपला असून शहागंज परिसरातील निजामुद्दीन चौकात विव्रेâत्यांनी बकरा, गोवंश आणि उंट आदी जनावरे विक्रीसाठी आणली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी मोठ्या फौजफाट्यासह शहागंज भागात कारवाई करीत कुर्बानी देण्यासाठी आणलेले दोन ट्रक भरून गोवंश व इतर जनावरे जप्त केली.
दरम्यान, पोलिसांनी अचानकपणे केलेल्या या कारवाईमुळे शहागंज परिसरातील विव्रेâत्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती. यावेळी काही विव्रेâत्यांनी पोलिसासोबत वाद घातल्याने शहांगज भागात तणाव निर्माण झाला होता. दंगा नियंत्रण पथक, क्युआरटी पथक यासह सिटीचौक, जिन्सी, बेगमपुरा, क्रांतीचौक सिडको पोलिस ठाण्याचे अतिरीक्त कर्मचारी शहागंज भागात बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!