Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad : कुत्रा पाळण्याच्या कारणावरून आई रागावली, ११ वर्षीय मुलाची आत्महत्या

Spread the love

मुकुंदवाडी परिसरातील दुदैवी घटना
औरंंंगाबाद : कुत्र्याचे पिल्लू पाळल्याच्या कारणावरून आई रागावल्याने ११ वर्षीय मुलाने गळफास घेवून आत्महत्या केली. ही दुदैवी घटना शनिवारी (दि.१०) दुपारी ३ वाजेच्या सुमारास मुकुंदवाडी परिसरातील प्रकाशनगर येथे घडली. सव्र्हेश रणजीतकुमार सहा (वय ११) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सव्र्हेश सहा हा सिडको एन-१ परिसरातील सेंट झेवियर्स शाळेत इयत्ता ७ वीमध्ये शिकत होता. सव्र्हेशने गेल्या काही दिवसापासून कुत्र्याचे पिल्लू पाळले होते. शनिवारी दुपारी कुत्र्याचे पिल्लू देवघरात गेले होते. त्यामुळे सव्र्हेशची आई सव्र्हेशवर रागावली होती. आई कुत्र्याचे पिल्लू पाळू देत नसल्याने रागाच्या भरात सव्र्हेश आपल्या खोलीत गेला. त्यानंतर सव्र्हेशने चादरीच्या सहाय्याने पंख्याला बांधुन गळफास घेतला.
सव्र्हेशने गळफास घेतल्याचा प्रकार कुटुंबियांच्या लक्षात येताच सव्र्हेशच्या शेजा-यांनी व नातेवाईकांनी त्याला फासावरून खाली उतरवून बेशुध्दावस्थेत उपचारासाठी घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
——————————————————-
्कोम्बिंग ऑपरेशनमध्ये सापडले ९५ आरोपी

औरंंंगाबाद : बकरी ईद आणि स्वातंत्र्यदिन सोहळ्यास कोणतेही गालबोट लागू नये यासाठी शहर पोलिसांनी शनिवारी (दि.१०) पहाटे ४ ते सकाळी ६ या वेळेत शहरात कोम्बिंग ऑपरेशन मोहिम राबवली. या मोहिमेदरम्यान १७ पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारे रेकॉर्डवरील ९५ गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली. त्यामध्ये विविध गुन्ह्यात फरार असलेले १५ आरोपी, विविध गुन्ह्यात पोलिसांना हवे असलेले २२ आरोपी, हद्दपारी आदेशाचे उल्लंघन करणारे ७ आरोपींचा समावेश आहे. या मोहिमेदरम्यान पोलिसांनी शहरातील ७३ हॉटेल व लॉजची तपासणी केली. पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त मिना मकवाना, निकेश खाटमोडे पाटील, डॉ.राहुल खाडे, सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ.नागनाथ कोडे, गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत, विशेष शाखेचे निरीक्षक संतोष पाटील यांच्यासह १७ पोलिस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचा-यांनी ही कारवाई केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!