Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना, मराठवाडा विभागातर्फे टिक टॉक क्वीन किंग या स्पर्धेचे आयोजन

Spread the love

आजकालची तरुणाई टिक टॉक या ॲपचा वापर करून आपले कलागुण दाखवत असते परंतु त्याचा काही उपयोग होत नाही… हे लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या मराठवाडा विभागाने टिक-टॉक कलाकारांसाठी एका अनोख्या स्पर्धेचे आयोजन केले आहे.. या स्पर्धेत “येरे येरे पैसा-2” या चित्रपटातील “अश्विनी ये ना” या गाण्यावरील अनु अभिनय करून 15 सेकंदांचा व्हिडिओ तयार करून 7588977135 या क्रमांक व्हाट्सअप क्रमांकावर पाठवायचं आहे. या स्पर्धेतून विजयी झालेल्या स्पर्धकांना टिकटॉक किंग आणि टिकटॉक क्विन पुरस्कार देण्यात येणार आहे.

चित्रपट सेनेचे जिल्हा संघटक कौस्तुभ आले यांच्या संकल्पनेतून तसेच मराठवाडा विभाग संघटक आशिष सुरडकर यांच्या मार्गदर्शनात ही स्पर्धा होत असून येत्या 9 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7 पर्यंत या स्पर्धेत प्रवेश दिला जाणार आहे.

स्पर्धेचा निकाल 13 ऑगस्ट रोजी “महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेना मराठवाडा अधिकृत” या फेसबुक पेजवर जाहीर केला जाणार आहे.

ही स्पर्धा टिक-टॉक च्या माध्यमातून 4 टप्प्यात होत असून पहिल्या टप्प्यात “गाण्यावर अभिनय सादर करणे” 2 टप्प्यात “संवादावर अभिनय सादर करणे” तिसऱ्या टप्प्यात “व्हिडीओग्राफी” व चौथ्या टप्प्यात या तीनही टप्प्यातील विजेत्यांना शॉर्ट फिल्म तयार करण्याचा प्रोजेक्ट दिला जाणार आहे. फिल्मच्या माध्यमातून नवीन कलाकारांना व्यासपीठ देण्याचे काम महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना करत आहे या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी संकेत शेटे, श्रुती काटे ,युवराज गवई,  कमलेश राजकडे,  सागर खंडागळे , दिपक गायकवाड,  अर्चना देवधर,  अश्विनी सोनवणे,  तेजस्विनी दोडवे , अमृता घोडके,  सिद्धार्थ खरात,  चिन्मय कुलकर्णी,  योगेश खाडे आदी आदी परिश्रम घेत आहेत

आपलं सरकार

Click to listen highlighted text!