द ग्रेट पेजंट कम्युनिटीच्या इंडियाच्या “मिस टीजीपीसी सीजन ७” या स्पर्धेसाठी डॉ. कोमल खिल्लारेचा संघर्ष जारी

Spread the love

द ग्रेट पेजंट कम्युनिटीच्या इंडियाज मिस टीजीपीसी सीजन ७ या स्पर्धेसाठी बुलढाणा येथील डॉक्टर कोमल मदन खिल्लारे हिची निवड झाली आहे.  ही एक ऑनलाईन सौंदर्य स्पर्धा असून देशभरातील १९०० स्पर्धकांमधून डॉक्टर कोमल ची निवड झाली आहे. कोमल हिने तिचे एमबीबीएस हे शिक्षण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथून पूर्ण केले असून  सध्या ती वैद्यकीय पदव्युत्तर पूर्व परीक्षेची ची तयारी करत आहे.

Advertisements

या आधी कोमलने गोवा येथे पार पडलेल्या मिस इंडिया परफेक्ट मोडेल 2018 हा किताब जिंकला आहे तर यावर्षीची कोमल ही एफबीबी कलर्स फेमिना मिस इंडिया 2019 पुणे फायनल लिस्ट होती.  द ग्रेट कम्युनिटी ही संस्था सौंदर्य स्पर्धांमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत आहे.  ऑनलाइन होणाऱ्या या स्पर्धेत स्पर्धकांना विविध राऊंड संदर्भातील आपले व्हिडिओ तयार करून पाठवावे लागणार आहेत.  परीक्षकांकडून त्यांची तपासणी होऊन मार्क्स दिले जाणार आहेत.  सप्टेंबर पर्यंत स्पर्धेची प्रक्रिया चालणार आहे.  स्पर्धेतील विजेते,  उपविजेते व अन्य विजेत्यांना मुंबई व पुणे येथे कार्यक्रमात पुरस्कार दिले जाणार आहेत. इंट्रोडक्शन, जनरल नॉलेज, रॅम्प वॉक, अशा राउंड मध्ये ही स्पर्धा होणार आहे.

दरम्यान डॉ. कोमल ला भरभरून मत देऊन तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा द्याव्यात असे आवाहन कोमलच्या मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

 

आपलं सरकार