Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

‘भोंगा’ला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा तर ‘अंधाधून’ ला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

Spread the love

संपूर्ण भारतीय कलाविश्वाचं लक्ष लागून राहिलेल्या मानाच्या ६६व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली आहे. आयुषमान खुराना, तब्बू आणि राधिका आपटे यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘अंधाधून’ सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट ठरला आहे. तर ‘भोंगा’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

श्रीराम राघवन दिग्दर्शित ‘अंधाधून’ या चित्रपटाचं प्रेक्षक-समीक्षकांकडून चांगलंच कौतुक झालं होतं. एक डोळस व्यक्ती अंधाच्या नजरेने जग शोधत असताना चित्रविचित्र घटना घडतात आणि चित्रपटाचा शेवट प्रेक्षकाला कोड्यात टाकतो. तर दुसरीकडे ‘भोंगा’ या मराठी चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी केली आहे.

जाहीर झालेले राष्ट्रीय पुरस्कार-

सर्वोत्कृष्ट चित्रपट- अंधाधून

सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन-  कृती महेश मिद्या व ज्योती तोमर यांना पद्मावत चित्रपटातील घूमर गाण्यासाठी

सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक- संजय लीला भन्साळी (पद्मावत)

सर्वोत्कृष्ट साऊंड डिझायनर- उरी

सर्वोत्कृष्ट अॅक्शन चित्रपट- केजीएफ

सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट- भोंगा

पुरेपूर मनोरंजन करणारा सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट- बधाई हो

सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट- पॅडमॅन

पर्यावर संवर्धनावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट- पाणी

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- स्वानंद किरकिरे (चुंबक)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- सुरेखा सिक्री (बधाई हो)

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक- अरिजीत सिंग (पद्मावतमधील बिंते दिल गाण्यासाठी)

सर्वोत्कृष्ट अभिनेता – आयुषमान खुराना (अंधाधून), विकी कौशल (उरी)

सर्वोत्कृष्ट डेब्यू दिग्दर्शक – सुधाकर रेड्डी (नाळ)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- आदित्य धर (उरी)

सर्वोत्कृष्ट बालकलाकार- श्रीनिवास पोकळे (नाळ)

सर्वोत्कृष्ट संवाद- बंगाली चित्रपट तारीख

सर्वोत्कृष्ट अॅडाप्टेट स्क्रीनप्ले- अंधाधून

आपलं सरकार

Click to listen highlighted text!