Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : बक-या, जनावरे चोरणारे दोघे गजाआड ग्रामीण गुन्हे शाखेची कारवाई

Spread the love

ग्रामीण भागातून बक-या व जनावरे चोरी करून विक्री करणा-या दोन जणांना ग्रामीण गुन्हे शाखा पोलिसांनी सापळा रचून गजाआड केले. बक-या चोरणा-यांच्या ताब्यातून पोलिसांनी एक बोलेरो पीकअप जीपसह रोख ४० हजार रूपये असा एकूण ४ लाख ४० हजार रूपये कििंमतीचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती ग्रामीण गुन्हे शाखेचे निरीक्षक भागवत फुुंदे यांनी शुक्रवारी (दि.९) दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नासेर शब्बीर पठाण (वय २४), शेख सोहेल शेख मजहर (वय १९), दोघे राहणार कासंबरी दर्गाह परिसर, पडेगाव असे अटक केलेल्या जनावरे चोरणा-यांची नावे आहेत. बक-या व इतर जनावरे चोरी करून विक्री करणारे दोघे बोलेरो जीप क्रमांक (एमएच-२०-बीएन-३६४४) ने राजूरमार्गे येत असल्याची माहिती ग्रामीण गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे ग्रामीण गुन्हे शाखेचे निरीक्षक भागवत फुंदे, उपनिरीक्षक भगतसिंग दुलत, जमादार गणेश मुळे, विठ्ठल राख, श्रीमंत भालेराव, सुनील शिराळे, धिरज जाधव, दिपेश नागझरे,गणेश गांगवे, योगेश तरमळे,संजय तांदळे आदींच्या पथकाने सिल्लोड तालुक्यातील पाल फाटा येथे सापळा रचून बोलेरो जीप अडवून जनावरे चोरी करणा-या दोघांना पकडले.
पोलिसांनी जीपची झडती घेतली असता त्यात जनावराचे मलमूत्र आढळून आले. पोलिसांनी नासेर पठाण व शेख सोहेल यांना खाक्या दाखवून चौकशी केली असता, दोघांनी वडोदबाजार, पीरबावडा,बोरगाव अर्ज, सिल्लोड तालुक्यातील भवन, सोयगांव, बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथून चोरलेल्या बक-या व जनावरे राजूर येथे विक्री केले असल्याचे सांगितले. पोलिसांनी दोघांच्या ताब्यातून ४ लाख रूपये कििंंमतीची बोलेरो जीप व रोख ४० हजार रूपये असा एकूण  ४ लाख ४० हजार रूपये विंâमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!