Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

अर्धनग्नावस्थेत ” ती ” पीडित तरुणी पोलीस ठाण्यात पोहोचली खरी, पण तक्रार घेऊन मदत करण्याऐवजी पोलिसांनी लावलं पळवून

Spread the love

गंभीर बलात्कार प्रकरण हाताळण्यात पोलिसांनी अतिशय बेजबाबदारपणा दाखवल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. बलात्कार झाल्यानंतर तक्रार नोंदवण्यासाठी पोलिसांकडे गेलेल्या पीडित तरुणीला मदत करण्याऐवजी पळवून लावण्यात आल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं आहे.

पोलिसी पेशाला काळिमा फासणारी ही घटना आहे. संतापजनक बाब म्हणजे पीडित तरुणी अर्धनग्न अवस्थेतच एका पोलीस अधिकाऱ्याकडून दुसऱ्या पोलिसाकडे मदतीसाठी धावा करत होती. पण या पोलिसांनी तिच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याची लज्जास्पद बाब समोर आली आहे. इतकंच नाही तर या पीडितेला पोलीस ठाण्यातून पळवण्याचं कामही दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी केलं. नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीसोबत ही घटना घडली आहे.

या विद्यार्थिनीनं पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्यावर पीडितेनं ड्युटी ऑफिसरकडे आपबीती सांगत तक्रार नोंदवण्यास विनंती केली. पण अधिकाऱ्यानं तिचं काहीही ऐकलं नाही. यानंतर जवळपास तासभर ही पीडित अर्धनग्न अवस्थेतच पोलीस स्टेशनमध्ये न्यायासाठी चकरा मारत होती. पण या गंभीर विषयात पोलिसांचा अतिशय हलगर्जीपणा पाहायला मिळाला.

दैनिक जागरणच्या वृत्तानुसार, आपल्यावर झालेल्या अत्याचाराविरोधात न्याय मागण्यासाठी पीडित वसंत कुंज पोलीस ठाण्यात गेली होती. येथे अंजना आणि सुमन नावाच्या दोन महिलांसोबत तिची बातचित झाली. पण या दोघींनीही तिची तक्रार नोंदवण्यासाठी मदत करणं तर सोडा साधं तिला जेएनयूपर्यंत पोहोचवण्यासही स्पष्ट नकार दिला. याप्रकरणी संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार नोंदवण्यात आली असून चौकशी सुरू आहे. दरम्यान, अत्याचाराची घटना आणि पोलिसांचं वर्तन यामुळे पीडित तरुणीला प्रचंड धक्का बसला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!