हृतिक रोशन याचे आजोबा दिग्दर्शक निर्माते जे. ओमप्रकाश यांचे निधन

Advertisements
Advertisements
Spread the love

राकेश रोशन यांचे सासरे, हृतिक रोशन याचे आजोबा आणि प्रख्यात दिग्दर्शक निर्माते जे. ओमप्रकाश यांचं वृद्धापकाळानं निधन झालं. ते ९३ वर्षांचे होते. जे ओमप्रकाश हे हृतिकची आई पिंकी रोशन यांचे वडील होते.

Advertisements

हृतिकनं काही दिवसांपूर्वीच जे ओमप्रकाश यांच्यासोबतचे दोन फोटो शेअर करत त्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर ‘आजोबांनी दिलेली शिकवण आता मी माझ्या मुलांना देणार आहे’, असं म्हणत हृतिकनं त्याच्या आयुष्यातील आजोबांचं स्थान अधोरेखित केलं होतं.

Advertisements
Advertisements

१९६१ साली ‘आस का पंछी’ या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली. १९७४ मध्ये ‘आप की कसम’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला सिनेमा होता. अफसाना दिलवालों का, ‘आदमी खिलौना है, आदमी और अफसाना, भगवान दादा, अर्पण, आसपास, आशा असे अनेक चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले.

आपलं सरकार