Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Honor Killing : गर्भवती मुलीचा खून करणाऱ्या पित्याला फाशीच : उच्च न्यायालय

Spread the love

नाशिक :  एकनाथ कुंभारकर याने २०१३ मध्ये  आंतरजातीय विवाह केलेल्या आपल्या १८ वर्षांच्या गर्भवती मुलीची केली होती हत्या


आंतरजातीय विवाह करणाऱ्या नऊ महिन्यांच्या गर्भवती मुलीची सामाजिक प्रतिष्ठेसाठी हत्या करणाऱ्याची फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाने मंगळवारी कायम ठेवली.  नऊ महिन्यांच्या गर्भवती मुलीची हत्या करून दोषीने वडील आणि मुलीतील नात्यांचाच खून केला आहे. अशी व्यक्ती समाजासाठीही धोकादायक आहे. या सगळ्यांचा विचार करता हे प्रकरण ‘दुर्मीळातील दुर्मीळ’ प्रकारात मोडते आणि म्हणूनच आरोपी हा कठोरातील कठोर अशा फाशीच्या शिक्षेसाठी पात्र असल्याचा निकाल न्यायालयाने दिला.

नाशिकस्थित एकनाथ कुंभारकर याने २०१३ मध्ये आपल्या १८ वर्षांच्या गर्भवती मुलीची हत्या केली होती. तिने अन्य जातीच्या मुलाशी लग्न केल्याने कुंभारकर याने तिची हत्या केली होती. नाशिक सत्र न्यायालयाने त्याला सगळ्या आरोपांत दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली होती. राज्य सरकारने ही शिक्षा कायम करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका केली होती. न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती स्वप्ना जोशी यांच्या खंडपीठाने मंगळवारी या प्रकरणी निर्णय देताना कुंभारकर याला कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली शिक्षा कायम केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!