Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : अर्धवट गर्भपातामुळे महिला दगावल्याचा पोस्टमार्टम रिपोर्ट येताच गुन्हा दाखल, डाॅक्टर फरार

Spread the love

औरंगाबाद – दोन वर्षापूर्वी झालेल्या अर्धवट गर्भपातामुळे दगावलेल्या महिलेचा पोस्टमार्टम रिपोर्ट मिळताच पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात डाॅ.गजानन शेळके, डाॅ.राणा मयतेचा पती रमेश शेप,सासरा अंगद शेप आणिअन्य एका महिलेविरुध्द विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.त्या पैकी डाॅ.राणा अटकेत असून डाॅ.शेळके फरार झाला आहे.

सारीका रमेश शेप रा. अंबाजोगाई असे मयत महिलेचे नाव आहे.दोन वर्षापूर्वी लाईफलाईन हाॅस्पिटल मधे तिला तिचा पती रमेश शेप आणि सासरा अंगद शेप यांनी उपचारासाठी दाखल केले होते. त्यावेळी मयत सारिका चा रक्तस्राव सुरु होता. पण उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला.म्हणून लाईफलाईन हाॅस्पिटल मधील डाॅ.सचिन बांगर यांच्याकडे उपलब्ध असलेल्या सी.सी. टि.व्ही. फुटेज च्या आधारे डाॅ. ढाकणे आणि बांगर यांचे जबाब नोंदवण्यात आले. या महिलेचा आकस्मात मृत्यू म्हणून पोलिसांनी नोंद घेतली होती. पण घाटी रुग्णालयाकडे पोलिसांनी मृतदेहाचा अहवाल मिळवण्यासाठी अर्ज केला होता. अहवाल मिळताच सर्व घटनाक्रम स्पष्ट झाला.

२१ जुलै २०१७ रोजी मयत सारिका यांचा पती रमेश आणि सासरा यांनी तिला औरंगाबादच्या लाईफलाईन हाॅस्पिटल बीडबायपास येथे दाखल केले. त्यानंतर तिचा डाॅ.गजानन शेळके आणि डाॅ. राणा यांनी अज्ञातस्थळी नेत गर्भपात करण्याचा प्रयत्न केला.तो अर्धवट झाला.व अर्भकाची विल्हेवाट लावली. त्यानंतर पुढील उपचारासाठी सारिकाला घाटी रुग्णालयात पाठवले असता तिचा म त्यू झाला. २२जुलै १७ रोजीमयताचे शवविच्छेदन झाले. पण गर्भपात केल्याचा प्रकार सारिकाच्या पती आणि सासर्‍यांनी पोलिसांपासून लपवला. ६आॅगस्ट २०१९ रोजी महिलेचा मृत्यू अर्धवट गर्भपातामुळे झाल्याचा अहवाल घाटीतील डाॅक्टरांनी दिल्या नंतर सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रेय बोटके यांच्या फिर्यादीवरुन मयत सारिका हिचा पती रमेश, सासरा अंगद, डाॅ. गजानन शेळके, डाॅ. राणा आणि अन्य एक महिला अशा पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक घन्नशाम सोनवणे करंत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!