Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Live News Update : Jammu & Kashmir : मोदी सरकारचा ऐतिहासिक निर्णय! जम्मू काश्मीरमधून कलम 370 रद्द, राष्ट्रपतींचीही मंजुरी

Spread the love

लोकसभेत मंगळवारी जम्मू-काश्मीर राज्यपुनर्रचना विधेयक मंजूर करणार: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे प्रतिपादन

जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा संपुष्टात

जम्मू-काश्मीर, लडाख आता केंद्रशासित राज्य; राज्यसभेत ऐतिहासिक विधेयक मंजूर

जम्मू-काश्मीर राज्यपुनर्रचना विधेयक राज्यसभेत १२५ विरुद्ध ६१ मतांनी मंजूर

तांत्रिक कारणास्तव मशीनद्वारे मतदान रद्द, चिठ्ठीद्वारे राज्यसभेत मतदान प्रक्रिया सुरू

 

अमरनाथ यात्रा रद्द केल्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीर संदर्भात राज्यसभेत निवेदन दिलं. यावेळेस त्यांनी जम्मू काश्मीरबाबतचा मोदी सरकारचा ऐतिहासिक निर्णय देखील सांगितला. यावेळेस त्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये लागू असलेले कलम 370 हटवण्याची शिफारस मांडली. यास शिफारशीला राष्ट्रपतींदेखील मंजुरी दिली टीव्ही वृत्त आहे. यानंतर विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी राज्यसभेत काश्मीरच्या विषयावर निवेदन केले असून  त्यांनी जम्मू-काश्मीरला लागू असलेले घटनेचे कलम ३७० हटवण्याची शिफारस मांडली. अमित शाह यांनी ही शिफारस मांडताच संसदेत मोठया प्रमाणावर गदारोळ झाला. मागच्या काही दिवसांपासून काश्मीरमध्ये मोठया प्रमाणावर सैन्यबळ वाढवण्यात आले आहे. सोमवारी मध्यरात्री जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे अध्यक्ष ओमर अब्दुल्ला या दोघांनाही नजरकैद करण्यात आले.

– काश्मीरमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून  राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. त्यावर पहिली चर्चा करण्याची आवश्यकता आहे – गुलाम नबी आझाद, काँग्रेस नेते

– संसदेत चार विधेयके मांडणार आहोत. ती सर्व काश्मीरसंबंधीच आहेत – अमित शाह
– केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याची शिफारस संसदेत मांडली.

काश्मीरची पुनर्रचना करण्याची गरज आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. काश्मीर संदर्भातला हा एक मोठा निर्णय, दोन विधेयकं आणि दोन संकल्पना शाह यांनी मांडलं आहे. त्यांनी ही शिफारस ठेवताच विरोधकांनी राज्यसभेत अभूतपूर्व गोंधळ घातला. ३७० कलम रद्द करण्यासंदर्भातलं एक मोठं पाऊल सरकारने उचललं आहे. याबाबत मोदी सरकारने प्रचंड गोपनियता बाळगली आहे.

जम्मू काश्मीर : कलम 370मधील काही खंड वगळली जाणार, अमित शहांची राज्यसभेत माहिती

राज्यसभेत केंद्रीय अमित शहा यांच्या भाषणाला सुरुवात, विरोधकांचा गोंधळ

काश्मीरप्रश्नी मोठा निर्णय होण्याची शक्यता

नवी दिल्ली: काश्मीरप्रश्नी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा थोड्याच वेळात संसदेत निवेदन करणार

नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

आपलं सरकार

Click to listen highlighted text!