Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रकुलगुरुपदी डॉ.प्रविण वक्ते

????????????????????????????????????

Spread the love

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रभारी प्रकुलगुरुपदी केमिकल टेक्नॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ.प्रविण वक्ते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 
मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी सदर नियुक्ती केली असून अधिष्ठातांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.    या  संदर्भात मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी सोमवारी (दि.पाच) यांनी सदर प्रकुलगुरु, चार अधिष्ठाता या संवैधानिक अधिकारी यांची नियुक्ती करुन नियुक्ती पत्र दिले. यामध्ये प्रकुलगुरुपदी डॉ.प्रविण श्रीधर वक्ते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ.वक्ते हे २१ वर्षापासून रसायन तंत्रज्ञान विभागात  कार्यरत असून सलग दहा वर्षांपासून विभागप्रमुखपदी कार्यरत आहेत. विद्यापीठाच्या ‘इंटलेक्चुअल प्रॉपर्टी राईटस‘चे संचालक म्हणूनही ते कार्यरत आहेत. डॉ वक्ते यांच्या नावावर औषधनिर्मिती क्षेत्रातील तीन पेटंट्स आहेत. देशातील विविध विद्यापीठांच्या अधिकार मंडळावर काम केले आहे.
दरम्यान, मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी अधिष्ठातांचीही नियुक्ती केली आहे.प्रभारी अधिष्ठातापदी कला व सामाजिक शास्त्रे विद्याशाखा डॉ.सतीश दांडगे (विभागप्रमुख, लोकप्रशासन विभाग, अधिसभा सदस्य), वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाख डॉ.मुरलीधर लोखंडे (माजी कुलसचिव व माजी वित्त व लेखाधिकारी), विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा डॉ.भालचंद्र वायकर तसेच आंतरविद्या शाखा अधिष्ठातापदी डॉ.संजिवनी मुळे (प्राचार्य, शिक्षणशास्त्र महाविद्यालय) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या हस्ते सोमवारी सायंकाळी नियुकतीपत्र देण्यात आले. यावेळी कुलसचिव डॉ साधना पांडे, उपकुलसचिव डॉ साधना पांडे, उपकुलसचिव दिलीप भरड यांची उपस्थिती होती. दरम्यान, नियुक्त करण्यात आलेले संवैधानिक अधिकारी मंगळवारी (दि. सहा) सकाळी पदभार घेणार आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!