Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पक्ष फोडणे हे हिटलरशाहीचे लक्षण… मी पक्ष फोडणार नाही –  प्रकाश आंबेडकर

Spread the love

ब्लॅकमेलिंगचे राजकारण सुरू आहे हे मी मानतो, परंतु राष्ट्रवादीतून जे पक्षांतर सुरू आहे त्यात अनेक नेत्यांच्या चौकश्या सुरू आहेत. त्यामुळे तिहार ऐवजी भाजपचा जेल या नेत्यांनी स्वीकारला आहे.” पक्ष फोडणे हे हिटलरशाहीचे लक्षण आहे. काँग्रेसने या आधी तसेच केले होते. आता भाजप कडून तेच चालू आहे. परंतु मी पक्ष फोडणार नाही. तसेच काँग्रेस राष्ट्रवादी मधील कोणाला पक्षात घेणार ही नाही, अशी स्पष्टोक्ती वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी बोलतांना केली.

राज ठाकरे यांच्या संधर्भात बोलतांना ते म्हणाले की, राज ठाकरे यांचे  ईव्हीएम विरोधातील आंदोलन म्हणजे पळकुटेपणा आणि फसवेपणा आहे. ईव्हीएम बाबातच्या आक्षेपांबाबत सुप्रिम कोर्ट आणि निवडणूक आयोगात लढा देणे गरजेचे आहे. तसे न करता केवळ आंदोलन करणार असाल तर तो पळपुटेपणा ठरेल. ईव्हीएम बाबत नागरिकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे, असे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.

भाजप आणि शिवसेनेकडून मुख्यमंत्री पदावर दावा करण्यात येत आहे. शिवेसेनेकडून बाण सुटला आहे. आता भाजपबरोबरच्या बैठकीत शिवसेना काय भूमिका घेते यावर सर्व अवलंबून आहे, आंबेडकर यांनी सांगितले. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत आंबेडकर बोलत होते. यावेळी त्यांनी विविध मुद्यावर भाष्य केले. काँग्रेससोबतच्या आघाडीबाबत बोलताना आंबेडकर म्हणाले, ”लोकसभेच्या निवडणुकांना काँग्रेसने वंचित ही भाजपची ‘बी टीम’ असल्याचा आरोप केला होता. त्याबाबत काँग्रेसने स्पष्टीकरण दिल्याशिवाय पूढील बोलणी करण्यात येणार नाही.  पक्षांतराबाबत ते म्हणाले की, “

आपलं सरकार

Click to listen highlighted text!