Pakistan : “लक्स कोझी ” अंडरवेअर घालणारा राजू लक्ष्मणला “भारताचा हेर ” म्हणून पाकने घेतले ताब्यात !!

Advertisements
Advertisements
Spread the love

भारताच्या एका गुप्तहेराला अटक केल्याचा दावा पाकिस्तानी पोलिसांनी केला आहे. पंजाबमधल्या डेरा गाजी खान जिल्ह्यातल्या राखी गज या भागातून या गुप्तहेराला अटक करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. राजू लक्ष्मण असं या गुप्तहेराचं नाव आहे. अटक केलेल्या माणसाने घातलेली अंडरवेअर ही Lux Cozi कंपनीची होती ही कंपनी भारतीय आहे त्यामुळे राजू हा भारताचा हेर असल्याचा दावा पाक पोलिसांनी केलाय.

Advertisements

याबाबतचं वृत्त वॉशिंग्टन पोस्टने दिलं आहे. पंजाब प्रांतात असलेल्या न्यूक्लिअर प्लांटमधली माहिती काढण्याचा राजूचा प्रयत्न होता. बलुचिस्तानमधून  डेरा गाजी खान या भागात प्रवेश करण्याचा राजूचा प्रयत्न होता असा दावा पोलिसांनी केलाय. याच भागातून कुलभूषण जाधव यांनाही अटक करण्यात आली होती असं पाकिस्तानने म्हटलं आहे.

Advertisements
Advertisements

राजू लक्ष्मण याला पाकिस्तानने चौकशीसाठी अज्ञात ठिकाणी नेलं असल्याचं सांगितलं जातंय. अटक केलेला मनुष्य हा भारतीय गुप्तहेर आहे हे दाखविण्यासाठी जो अंडरवेअरचा पुरावा दिला गेला त्यावरून सोशल मीडियावर पाकिस्तानची खिल्ली उडवलीय जातेय. केवळ भारतीय कंपनीची अंडरवेअर घातली म्हणून तो गुप्तहेर कसा काय असू शकतो असा प्रश्न आता विचारण्यात येतोय.

आपलं सरकार