Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : दामदुपटीचे आमिष दाखवून फसवणूक : भामट्याने घातला महिलेस १ लाख ५७ हजाराचा गंडा

Spread the love

आमच्या यु टु व्ही ऑनलाईन प्रायव्हेट लिमिटेड या वंâपनीत गुंतवणूक केल्यास दामदुपटीने परतावा मिळेल असे आमिष दाखवून उत्तरप्रदेशच्या भामट्याने समर्थनगर भागात राहणा-या महिलेस १ लाख ५७ हजार ४०० रूपयांचा गंडा घातला. हा प्रकार मार्च ते एप्रिल २०१८ या काळात घडला असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले. सतीश तिवारी (रा.नसदपुर, ता.कादीपुर, जि.सुलतानपुर, उत्तरप्रदेश) असे भामट्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समर्थनगर परिसरातील रहिवासी तेजस्वीनी सुधाकर गायकवाड (वय ३५) यांनी मार्च २०१८ मध्ये वर्तमानपत्रात आलेल्या जाहिरातीनुसार यु टु व्ही ऑनलाईन प्रायव्हेट लिमिटेड या वंâपनीच्या सेमीनारमध्ये भाग घेतला होता. त्यावेळी कंपनीचा  सीएमडी असल्याचे सांगून सतीश तिवारी याने तेजस्वीनी गायकवाड यांना आपल्या वंâपनीत पैसे गुंतविल्यास दामदुपटीने पैसे मिळतील असे आमिष दाखविले होते. त्यावेळी गायकवाड यांनी पहिल्यांदा दोन आयडी तयार करीत १२ हजार ६०० रूपये गुंतविले होते. त्यानंतर २० आयडी तयार करीत १ लाख ६० हजार असे एकूण  १ लाख ७२ हजार ६०० रूपये गुंतविले होते.

दरम्यान, सुरूवातीच्या काळात सतीश तिवारी याने तेजस्विनी गायकवाड यांना १६ हजार २०० रूपये परतावा दिला. परंतु नंतर तिवारी याने परतावा देण्यास चालढकल करण्यास सुरूवात केली. तसेच तिवारी याने गायकवाड यांना दिलेले धनादेशही वटले गेले नाहीत. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यावर तेजस्वीनी गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून भामट्याविरूध्द क्रांतीचौक पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक राठोड करीत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!