Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

नोकरीच्या शोधात आहात ? मग हि संधी चेक करा …

Spread the love

इंटरनॅशनल इन्स्टिट्युट फाॅर पाॅप्युलेशन (IIPS ) म्हणजेच आंतरराष्ट्रीय लोकसंख्या संस्था इथे नोकरीची चांगली संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी या पदासाठी 16 ऑगस्टपर्यंत अर्ज करावा. ही भरती फॅमिली हेल्थ सर्वेसाठी होतेय. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून याला मदत मिळते.

या पदासाठी एकूण 15 जागा आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे Demography/Mathematics/ Statistics/Social Sciences यात M.Philची पदवी हवी. शिवाय दोन वर्षांचा कामाचा अनुभव हवा. किंवा IIPS सोबत मास्टर ऑफ पाॅप्युलेशन स्टडीजबरोबर एक वर्ष कामाचा अनुभव हवा. याशिवाय फिल्डवर कामाचा अनुभव हवा. निवड झालेल्या उमेदवाराला फिल्ड वर्क करावं लागेल. शिवाय माॅनिटरिंग आणि सुपरविजनचं काम दिलं जाईल. त्याला IIPSला नियमित रिपोर्टिंग करावं लागेल.

असा करा अर्ज

उमेदवाराला आपला CV, पदवी प्रमाणपत्र, फोटो आणि इतर डाॅक्युमेंट्स nfhs5adm@gmail.com वर ईमेल करावे लागतील. उमेदवाराला कव्हरिंग लेटर लिहावं लागेल. त्यात सब्जेक्ट असेल Application for ‘Post Name’ vide advertisement no: IIPS/NFHS-5/13/2019. तसं नमूद करावं लागेल.

काय आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना, चिफ मिनिस्टर एम्पलाॅयमेंट जनरेशन प्रोग्राम ( CMEGP ) ?

याशिवाय, राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन सरकार लवकरच रोजगाराची योजना सुरू करतेय. चिफ मिनिस्टर एम्पलाॅयमेंट जनरेशन प्रोग्राम ( CMEGP ), मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना असं या योजनेचं नाव आहे. या योजनेअंतर्गत पुढच्या 5 वर्षात 10 लाख नोकऱ्या निर्माण केल्या जातील. या योजनेअंतर्गत 10 हजार अति छोट्या, लहान आणि मध्यम आकाराच्या इंडस्ट्रियल युनिटला प्रत्येकी 15 लाख रुपये दिले जातील. त्याबदल्यात दर वर्षी या उद्योगांकडून 2 लाख नोकऱ्या दिल्या जातील.

पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेवरूनच या योजनेनं प्रेरणा घेतलीय. या योजनेत महाराष्ट्रातून 16 हजारांनी अर्ज केलेत. खरं तर लक्ष्य होतं 5 हजाराचं. याचा अर्थ बेरोजगारांची संख्या जास्त आहे. उद्योगखात्यानं मिळवलेल्या माहितीनुसार जवळजवळ 40 लाख बेरोजगार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेत बऱ्याच जणांना नोकरीची संधी आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!