Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

धक्कादायक : मुंबईत युवतीवर सामूहिक बलात्कार , पीडितेचा जीवन – मृत्यूचा संघर्ष , औरंगाबाद पोलिसांची तडक फडकी कारवाई

Spread the love

मुंबईत आपल्या भावासोबत राहणाऱ्या पीडितेवर चार जणांनी पाशवी बलात्कार केल्याने पीडिता गंभीर जखमी झाली असून औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात तिचा जीवन -मृत्यूचा संघर्ष चालू आहे. या प्रकारांची माहिती मिळताच बेगमपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी अत्यंत तत्परतेने घाटी रुग्णालयाशी संपर्क साधून आवश्यक ती प्राथमिक माहिती मिळवून पीडितेच्या जबाब घेण्याचा प्रयत्न केला परंतु पीडितेची प्रकृती अत्यंत गंभीर असून ती जबाब देऊ शकत नाही. दरम्यान तपास  प्रकरणात कोणतीही दिरंगाई नको म्हणून रुग्णालयाच्या अधिकृत सूत्रांनी आपले ओपिनियन देताच प्राथमिक तपास  करणारे पोलीस उपनिरीक्षक एन. बी. शिम्ब्रे यांनी तत्काळ कार्यवाही केली.

याविषयी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती  अशी कि , दिनांक २५ जुलै रोजी पीडितेला तिच्या आई-वडिलांनी उपचारार्थ घाटी रुग्णालयात दाखल केल्यानंतर सीएमो औरंगाबाद यांनी एम एल सी नंबर ०/१/२०१९ नुसार  घाटी मेडिकल चौकीचे पोलीस एम डी . सोनवणे यांनी बेगमपुरा पोलिस ठाण्यात फोन द्वारे कळविले की घाटी दवाखाना एम एल सी नंबर 22349 /एमए एच / 2019 दिनांक २८ जुलै २०१९ वेळ २२ .३५ वाजता सदर पीडितेला उपचारार्थ घाटी दवाखाना अपघात विभाग येथे आणून दाखल केले असून सीएमो यांनी  समक्ष कळविले कि ,  मुंबई येथे लैंगिक शोषण झाले असून दिनांक 25 जुलै 2019 पासून तिच्यावर घाटी रुग्णालयात उपचार चालू आहेत.  याकामी पुढील  चौकशीची जबाबदारी पोलीस उपनिरीक्षक एन. बी. शिम्ब्रे यांच्याकडे देण्यात आली.  या m.l.c. वरून पोलीस उपनिरीक्षक एन. बी. शिम्ब्रे यांनी घाटी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पीडित मुलीचा जबाब नोंदविण्यासाठी लेखी विनंती केली ,  मात्र सदर पीडित जबाब देण्याच्या स्थितीत नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान दोन दिवस बेगमपुरा पोलिसांनी सदर पीडितेचा जबाब घेण्याचा प्रयत्न केला परंतु पीडितेच्या प्रकृतीत कुठलीही सुधारणा न झाल्याने अखेर पीडितेच्या वडीलांचा जबाब घेऊन अज्ञात आरोपींविरुद्ध भादवि 376,  34 अन्वये  बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.  ०/२०१९ अन्वये दाखल केलेला हा गुन्हा पुढील तपासासाठी बेगमपुरा पोलिसांनी,  चुनाभट्टी पोलीस स्टेशन मुंबई यांच्याकडे वर्ग केला आहे. मुंबई पोलीस या प्रकरणात अधिक तपास करीत आहेत.

पीडितेच्या वतीने तिच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की सदर मुलगी वय 19 ही आपल्या दोन भावांचा समवेत चेंबूर येथे राहत होती. दरम्यान 14 जुलै रोजी मुलाचा फोन आला कि, प्रिया ( काल्पनिक नाव ) आजारी असून तिच्यावर उपचार केले तरी  तिच्या प्रकृतीत सुधारणा होत नाही , तुम्ही मुंबईला या . त्याप्रमाणे मी मुंबईला गेलो आणि व 17 जुलै रोजी प्रियाला सोबत घेऊन  रेल्वेने परतूरला आलो.  तेथून आम्ही आमच्या गावी आलो.  गावातील डॉक्टरांना डॉक्टरांकडे तिला उपचारासाठी नेले परंतु तिच्या प्रकृतीत कुठलीही सुधारणा न झाल्यामुळे अखेर दि . 25 जुलै रोजी आम्ही तिला घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.  तिच्यावर उपचार करत असताना डॉक्टरांनी आम्हाला विश्वासात घेऊन सांगितले कि , प्रियावर  लैंगिक अत्याचार झाले आहेत आणि तिची प्रकृती गंभीर आहे.  दरम्यान मी व तिच्या  आईने तिला विश्वासात घेऊन विचारपूस केल्यानंतर तिने सांगितले कि , ७ जुलै २०१९ सकाळी १० वाजण्याच्या सुमारास तिने तिच्या वहिनीला सकाळी १० वाजता सांगितले कि , ती तिच्या मैत्रिणीच्या वाढ दिवसाला जात आहे आणि सायंकाळी ६ वाजता घरी परत आली पण कुणाशीही बोलली नाही. दरम्यान तिने आम्हाला सांगितले कि , तिच्यावर चार इसमांनी लैंगिक अत्याचार केले पण त्या  चौघांची नवे मात्र तिने अद्याप सांगितले नाही. सदर प्रकरण चेंबूर , लाल डोंगर परिसर येथे घडल्याचे सांगत आहे. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित नराधमांचा शोध घेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार करणाऱ्यांना अटक करावी.
दरम्यान पीडितेच्या वडिलांनी दाखल केलेल्या या तक्रारीवरून बेगमपुरा पोलिस ठाण्यात ०/२०१९ नुसार  भादवि 376 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून हा गुन्हा पुढील तपासासाठी चुनाभट्टी पोलिस ठाणे मुंबई यांच्याकडे अधिक तपासासाठी वर्ग केला आहे.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन बेगंपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एन बी केंद्रे यांनी तात्काळ प्राथमिक तपास करून हा गुन्हा वर्ग करण्याच्या कामी कौतुकास्पद प्रयत्न केले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!