Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Viral Video : तुम्ही पहाच !! पत्रकारितेने गाठला अक्षरश: रिपोर्टींगचा ” तळ ” !!

Spread the love

आजकाल बातमी कव्हर करण्याच्या स्पर्धेत कोण काय करेल याचा नेम नाही. पाकिस्तानातील एका टीव्ही पत्रकाराने वार्तांकनाचा जणू तळच गाठला आहे. पंजाब प्रांतात सध्या पूरस्थिती असून या स्थितीचं वस्तूस्थितीजन्य वार्तांकन करण्यासाठी हा पत्रकार थेट पुराच्या पाण्यात उतरला आणि गळाभर पाण्यातून त्याने ‘लाइव्ह रिपोर्टिंग’ केलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पाकिस्तानमधील जीटीव्ही न्यूज चॅनलने आपल्या यूट्युब चॅनलवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. अझादर हुसेन असे या पत्रकाराचं नाव असून तो गळाभर पाण्यात उभा राहून हातात बूम पकडून परिसरातील पूरस्थितीचे वर्णन करत आहे.

‘पाकिस्तानी पत्रकार पुराच्या पाण्यात; जीव धोक्यात घालून केलं वार्तांकन’ अशा आशयाचं शिर्षक या व्हिडिओला देण्यात आलं असून त्यावर सोशल मीडियातून उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. ‘खोलात जाऊन वार्तांकन’, ‘गुडघ्यात वाकून वार्तांकन केलं जात आहे’, अशी टोलेबाजी काहींनी केली तर काहींनी या पत्रकाराचं कौतुकही केलं आहे.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी वाहत्या नदीत उभं राहून वार्तांकन करतानाचा पाकिस्तानातील पत्रकाराचा असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!