Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

“सीसीडी” चा डोलारा : ४ हजार ३३१ कोटींची वार्षिक उलाढाल , विदेशातील ११ शाखांसह २८ राज्यांमध्ये १ हजार ७७२ शाखा

Spread the love

‘सीसीडी’चे संस्थापक व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांचे जावई व्ही. जी. सिद्धार्थ यांनी बेपत्ता होण्यापूर्वी कंपनीच्या संचालकांना लिहिलेल्या पत्रामध्ये कंपनीच्या माध्यमातून ३० हजार रोजगारांची निर्मिती झाल्याचे म्हटले आहे. ज्या सीसीडी ब्रॅण्डमुळे सिद्धार्थ ओळखले जातात, त्या सीसीडीमध्ये आज पाच हजारहून अधिक जण प्रत्यक्षपणे कामाला आहेत. जाणून घेऊयात थोडक्यात सीसीडी विषयी.

सीसीडीची वार्षिक उलाढाल ४ हजार ३३१ कोटी रुपयांहून (६८.९ मिलियन डॉलर) अधिक आहे. चिकमंगळुरुमध्ये सीसीडीच्या मालकीची २० हजार एकर जमीन आहे. यामध्ये अॅरेबिका या कॉफीच्या बियांची लागवड केली जाते. ही कॉफी अमेरिका, युरोप आणि जपानमध्ये निर्यात केली जाते. १९९६ साली सीसीडीचे पहिले रेस्टॉरंट सुरु झाले. ११ जुलै १९९६ रोजी बंगळुरुमधील ब्रिज रोडवर सीसीडीची पहिली शाखा सुरु करण्यात आली. मार्च २०१८ पर्यंत भारतातील २८ राज्यांमध्ये ‘सीसीडी’च्या १ हजार ७७२ शाखा सुरु करण्यात आल्या आहेत. भारताबरोबरच ऑस्ट्रीया (व्हिएन्ना), चेक प्रजासत्ताक, मलेशिया, इजिप्त आणि नेपाळमध्येही ‘सीसीडी’च्या शाखा आहेत.

२०१० मध्ये अमेरिकेतील कार्लबर्ग कार्व्हीस रॉबोर्टस या कंपनीने सीसीडीमध्ये एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली. याच वर्षी कंपनीने त्यांचा लोगो बदलून आताचा लोगो वापरण्यास सरुवात केली. २०१० मध्ये ‘सीसीडी’ने झेक प्रजासत्ताकमधील कॅफे इम्पीरीओ ही कंपनी विकत घेतली. झेक प्रजासत्ताक कॅफे इम्पीरीओच्या ११ शाखा असून पोर्तुगालमध्ये सात तर ब्रुनोमध्ये एक शाखा आहे.

सिद्धार्थ बेपत्ता झाले असून त्यांच्या शोधासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. नेत्रावती नदीच्या पुलावर त्यांच्या ड्रायव्हरनं त्यांना सोडलं अशी शेवटची माहिती आहे. त्यामुळे २०० पेक्षा पोलिस कर्मचारी व २५ बोटींच्या सहाय्यानं ही शोधमोहीम सुरू आहे.

भाजपा नेते एस. एम. कृष्णा यांचे जावई आणि कॅफे कॉफी डेचे (सीसीडी) मालक आणि संस्थापक व्ही. जी. सिद्धार्थ सोमवारपासून बेपत्ता झाले आहेत. मंगळुरू पोलिसांनी सिद्धार्थ यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे सिद्धार्थ यांचा शोध सुरु असतानाच शेअर बाजारामध्ये सीसीडीच्या शेअरचा भाव २० टक्यांनी गडगडला आहे. कंपनीचं काय होणार या विवंचनेचे पडसाद शेअर बाजारात उमटल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.  त्यामुळे आता सिद्धार्थ बेपत्ता झाल्यानंतर ‘सीसीडी’चे काय होणार?, कंपनी बंद पडून कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड पडणार का? अशा चर्चांना सुरुवात झाली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!