Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

एक इंद्रनील, एक ययाती , थोरला आवडे आईला तर धाकटा पित्याला !! आमदार बनणार कोण ? राष्ट्रवादी आमदाराचा एक पूत्र ” मातोश्री रिटर्न “

Spread the love

गेल्या विधानसभा निवडणुकीत विदर्भातून निवडून आलेले राष्ट्रवादीचे एकमेव आमदार मनोहरराव नाईक शिवसेनेच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा असून आज पुसद येथील नाईकांच्या बंगल्यावर कार्यकर्त्यांची बैठक बोलाविण्यात आली आहे. मनोहरराव यांचे धाकटे चिरंजीव इंद्रनील यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. पुसद विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून मनोहरराव नाईक यांच्या कुटुंबात कलह निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळावी म्हणून मनोहरराव यांची दोन्ही मुलं ययाती व इंद्रनील यांनी अर्ज दाखल केले असून उमेदवारीवरून त्यांच्यात वाद निर्माण झाला आहे. मनोहरराव यांचा कल इंद्रनीलच्या बाजूने आहे तर मनोहरराव यांच्या पत्नी नगराध्यक्षा अनिता नाईक या ययातीच्या बाजूने असल्याची चर्चा पुसदमध्ये आहे.

दरम्यान, इंद्रनील यांनी सेनेत जाण्याची तयारी सुरू केली आहे. काल इंद्रनील यांनी मुंबईत ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन सेनेच्या प्रवेशाबद्दल चर्चा करून रात्री ते पुसदकडे निघाले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून मनोहरराव नाईक प्रकृतीमुळे बेजार असून यावेळी विधानसभेची निवडणूक लढविण्यास तयार नसल्याचे त्यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार याना कळविले आहे. नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात ते मुबईला जाऊ शकले नाहीत. आपल्यासोबत वडील मनोहरराव यांच्यासह सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सेनेत यावे, असा आग्रह इंद्रनील यांचा आहे. त्यादृष्टीने आज शनिवारी पुसदच्या बंगल्यावर होणारी बैठक महत्वाची राहणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!