Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

हल्ली संवादांपेक्षा व्देषाचे राजकारण सुरू आहे , हे कुठे तरी थांबायला हवे : आ. ह. साळुंखे

Spread the love

देशात आज अनेक मुद्यांवरून वेगवेगळे मतप्रवाह आहेत. संवाद दुरावत चालला असून, जाती-धर्माच्या नावावर विभागणी होत आहे. आज हिंदू आणि मुस्लिमांचे जे वाद आहेत, ते गुण्या गोविंदाने एकत्रित बसूनच सुटू शकतात. कोणीच कोणाला हाकलून देऊन अथवा संहार करून हा प्रश्न न मिटणारा आहे. हल्ली संवादांपेक्षा व्देषाचे राजकारण सुरू असल्याने चिंतेत वाढच होत आहे. हे कुठे तरी थांबवण्यासाठी सर्वंनी एकत्र येऊन विचार करण्याची गरज आहे. धर्म आणि जातीच्या नावावरील तेढ न शोभणारी आहे असे प्रतिपादन प्रसिध्द विचारवंत तथा साहित्यिक डॉ. आ.ह. साळुंके यांनी केले. गुरुवारी त्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त गौरव सोहळ्याला उत्तर देताना केले. या बद्दल आपण १९९० मध्ये एका पुस्तकातून प्रकाश टाकला होता असे ते म्हणाले.
जालना येथील आ.ह. साळुंके अमृत महोत्सवी सत्कार समितीकडून या सोहळ्याचे आयोजन मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री डॉ. शंकरराव राख होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून उस्मानाबाद येथील प्रा. अर्जुन जाधव यांची उपस्थिती होती. यावेळी मंचावर आर आर खडके पाटील , विजयकुमार पंडित यांचीही उपस्थिती होती.

अध्यक्षस्थानावरून अगदी थोडक्यात बोलताना माजी मंत्री डॉ . शंकरराव राख म्हणाले कि , डॉ . आ. ह. साळुंखे हे आधुनिक काळातील दुसरे महात्मा फुले आहेत. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा . डॉ. रावसाहेब ढवळे  यांनी केले , सूत्रसंचालन एकनाथ शिंदे यांनी केले तर डॉ . शशिकांत पाटील यांनी गौरवपत्राचे वाचन केले.

यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले कि , आजची तरूण पिढी भरकटलेली आहे, असा जो समज पसरवण्यात येत आहे, ते आपल्याला मान्य नाही. आज अनेक युवक-युवती हे चांगले काम करून सत्य आणि वास्तवाची कास धरताना दिसतात. चळवळींच्या माध्यमातून समाजातील चुकीच्या चालीरीतींवर आसूड ओढताना दिसत आहेत. त्यामुळे तरुणांना दिशा देण्यासाठी ज्येष्ठांनी पुढाकार घेण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. कुठल्याही सांगीव अथवा सिद्ध न होणाऱ्या गोष्टींवर विश्वास न ठेवता जो पर्यंत चिकित्सक पध्दतीने स्वत: अनुभव घेत नाही, तो पर्यत ती गोष्ट सत्य आहे, असे मानू नये असे हजारो वर्षापूर्वी भगवान गौतम बुध्दांनी सांगितले आहे. विज्ञानही तेच सांगते,

भगवान गौतम बुध्द, रवींद्रनाथ टोगोर, चार्वाक, महात्मा बसवेश्वर तसेच संत तुकाराम महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महान व्यक्तींच्या प्रेरणेतून गुलामगिरीला नख लावण्याचे काम झाले आहे. संत तुकारामांनी जो विद्रोह केला, त्याचा प्रचार केला जात नसून, त्यांचे चमत्कार सांगितले जात असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. प्रतिकूल परिस्थितीत हताश न होता, त्याकडे एक संधी म्हणून पाहण्याची गरज त्यांनी सांगितली. चिकित्सेला महत्त्व देण्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या आयोजनाविषयी बोलताना ते म्हणाले कि ,  जालन्याचा आणि माझा संबंध हा फार जुना आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमानिमित्त मी जालन्यात आलो असल्याचे ते म्हणाले. भारतीय संस्कृती, तसेच त्यातील विविधता, विविध धर्म, जातींच्या परंपरा या दोष नसून, ते एक वैभव आहे. त्यामुळेच आपण एकसंघ आहोत. या वेगवेगळ्या परंपरा म्हणजे निसर्गातील विविध रंगांची फुले असल्याचे सांगून त्यांनी याचे महत्त्व विशद केले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!