Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मोबा लिंचिंगवर पत्रयुद्ध !! ४९ दिग्गजांच्या विरोधात ६१ मोदीवादी प्रतिभावंतांचे खुले पत्र ….

Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील झुंडबळीच्या घटना रोखण्यासाठी विविध क्षेत्रातील ४९ दिग्गज व्यक्तींनी पत्र लिहून चिंता व्यक्त केल्यानंतर आता देशात पत्रयुद्धच सुरू झाले आहे. या ४९ दिग्गजांच्या पत्राला उत्तर देत देशभरातील ६१ सेलिब्रिटींनी खुले पत्रच प्रसिद्ध केले आहे. झुंडबळीविरोधात ४९ दिग्गजांनी लिहिलेले पत्र हे ‘सिलेक्टिव्ह आउटरेज’ आणि ‘फॉल्स नॅरेटीव्ह्ज’चा (खोटे कथन) प्रयत्न करणारे असल्याचे ६१ प्रतिभावंतांच्या खुल्या पत्रात म्हटले आहे.

हे खुले पत्र लिहिणाऱ्या प्रतिभावंतांमध्ये अभिनेत्री कंगना रनौट, लेखक प्रसून जोशी, शास्त्रीय नृत्यांगना आणि खासदार सोनल मानसिंह, वादक पंडित विश्वमोहन भट्ट, चित्रपट निर्माता मधुर भांडारकर आणि विवेक अग्निहोत्री यांचा समावेश आहे. या खुल्या पत्रात पंतप्रधानांना पत्र लिहिणाऱ्या ४९ दिग्गजांना ‘स्वयंघोषित रक्षक; असा टोलाही हाणला आहे. या ४९ दिग्गजांचा उद्देश निव्वळ राजकीय असल्याचेही या प्रतिभावंतांनी खुल्या पत्रात म्हटले आहे. नक्षलवादी हल्ल्यात जेव्हा आदिवासी आणि गरिब मारले जातात, तेव्हा हे सर्व गप्प असतात असेही या प्रतिभावंतांनी खुल्या पत्रात नमूद केले आहे.

काश्मीरमध्ये फुटिरतावाद्यांनी शाळा बंद केल्या तेव्हा हे लोक कुठे होते?, जेएनयूमध्ये घोषणाबाजी होत होती तेव्हा हे कुठे होते?, देशाचे तुकडे तुकडे करण्याच्या घोषणा देण्यात आल्या, तेव्हा या लोकांनी आपले विचार का नाही व्यक्त केले?…. असे एकापेक्षा एक प्रश्न या खुल्या पत्रात विचारण्यात आले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!