Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Karnatak Political Drama : तीन बंडखोर आमदारांचे सदस्यत्व रद्द

Spread the love

कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष के. आर. रमेश कुमार यांनी तीन आमदारांचे सदस्यत्व रद्द केले आहे. यात अपक्ष आमदार आर. शंकर आणि काँग्रेस आमदार रमेश जर्कीहोली आणि महेश कुमटल्ली यांचा समावेश आहे. आमदारांच्या अयोग्यतेच्या मुद्द्यावर रमेश कुमार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी ही माहिती दिली. अन्य आमदारांच्या राजीनाम्याविषयीदेखील येत्या दोन दिवसांत निर्णय घेण्यात येणार आहे.

आमदारांच्या राजीनाम्याचं प्रकरण खूपच जटील आहे, त्यामुळे घाईगर्दीत कोणताही निर्णय घेता येणार नाही, असे रमेश कुमार यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘सर्वोच्च न्यायालयाने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्यास मी पात्र ठरेन. मी माझ्या विशेषाधिकाराचा वापर करेन.

बंडखोर आमदारांना समक्ष उपस्थित राहून आपले म्हणणे मांडण्याची संधी आता मिळणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. पक्षांतरबंदी कायद्यानुसार बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर निर्णय घेण्यासाठी विधानसभा अध्यक्ष स्वतंत्र आहेत, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने १७ जुलै रोजी दिला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!