Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

एटीएस ने मुंब्र्यातून अटक केलेल्या “त्या ” दहा दहशतवाद्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल , प्रसादात विष कळवण्याचे होते षडयंत्र

Spread the love

मुंबई एटीएस पथकाने मुंब्र्यातून अटक केलेल्या दहाही तरुणांनी घातक षडयंत्र रचल्याचं उघडकीस आलं आहे. मुंब्रा येथील मुंब्रेश्वराच्या मंदिरातील महाप्रसादात हे दहाही जण विष कालवणार होते, महाप्रसादात विष टाकून लोकांना मारण्याचा त्यांचा डाव होता. तसंच हे सर्व तरुण झाकीर नाईकपासून प्रभावित होते, असं एटीएसने दाखल केलेल्या आरोपपत्रात नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली मुंब्र्यात चारशे वर्ष जुनं मुंब्रेश्वर मंदिर आहे. या मंदिरात श्रीमद भागवद् कथेचं डिसेंबरमध्ये आयोजन करण्यात आलं होतं. ही संधी साधून अटक करण्यात आलेल्या तलाह ऊर्फ अबूबकर पोतरिकने मंदिरातील महाप्रसादात विष टाकण्याचा प्लान तयार केला होता. मात्र त्या दिवशी मंदिरात ४० हजाराहून अधिक भाविक आल्याने त्यांची योजना फोल ठरल्याचं आरोपपत्रात म्हटलं आहे.

अबू हमजा हा या ग्रुपचा मोहोरक्या असून त्याने मुंब्रा बायपास येथे स्फोटाचं प्रात्यक्षिकही केलं होतं. हमजा आणि पोतरिकला या कामात मोहसीन खान उर्फ अबू मोर्या, अताई वारीस अब्दूल रशीद शेख उर्फ मझहर शेख, मोहम्मद तकीउल्लाह सिराज खान, मुशाहेदूल इस्लाम उर्फ तारेख, जम्मन खुठेऊपाड उर्फ अबू किताई, सलमान खान उर्फ अबू उबेदा आणि फरहाद अन्सारी यांनी साथ दिल्याचं एटीएसने म्हटलं आहे. यातील दहावा आरोपी अल्पवयीन आहे. हे सर्वजण मुंब्रा आणि औरंगाबादचे रहिवासी आहेत.

आरोपपत्रानुसार हे दहाही जण झाकीर नाईकपासून प्रेरित होते. या दहाही जणांच्या सोशल मीडियावरून झाकीर नाईकचे फोटो आणि व्हिडिओज जप्त करण्यात आले आहेत. हे दहाही जण मुंब्रा परिसरातील आणखी सहाजणांची माथी भडकावण्याचं काम करत होते. मात्र या सहा तरुणांनी पोलिसांत धाव घेतल्यानंतर या षडयंत्राचा पर्दाफाश झाला आहे. अटक करण्यात आलेले दहा जण उच्चशिक्षित आणि टेक्नोसॅव्ही आहेत. एकमेकांशी संपर्कात राहण्यासाठी ते टेलिग्राम या ॲपचाही वापर करत होते. टेलिग्रामद्वारे या दहाही जणांनी एकमेकांना बॉम्ब बनविण्याच्या साहित्याची माहिती पुरवली होती, असंही आरोपपत्रात नमूद करण्यात आलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!