दुचाकीसह वाहून गेलेल्या दुसऱ्या वनरक्षकाचा ही मृतदेह सापडला

Advertisements
Advertisements
Spread the love

कन्नड भारबा ता. येथून जवळ असलेल्या भारंबा-तांडा नदी नाल्यावरून वाहणाऱ्या पुरात शनिवारी (२० जुलै) वाहून गेलेल्या वनरक्षकांपैकी दुसऱ्या वनरक्षकाचा मृतदेह सोमवारी (२२ जुलै) सापडला. नदीला सायंकाळी आलेल्या पुरात वनविभागाचे दोन वनरक्षक वाहून गेले होते. त्यात राहुल जाधव आणि अजय भोई हे वनपक्षक वाहून गेले होते. त्यापैकी राहुल जाधव यांचा मृत्यदेह दुसऱ्या दिवशी, रविवारी (२१ जुलै) सकाळी ११च्या सुमारास नाल्याजवल आढळून आला होता. अजय भोई यांचा मृतदेह सोमवारी (२२ जुलै) दुपारी चार वाजता सापडला. जाधव यांचा मृतदेह पिशोर ग्रामीण रुग्णालयात आणून उत्तरीय तपासणी करून नातेवाईकांच्या स्वाधीन केला. दुसऱ्या दिवसी भोई यांना शोधण्यासाठी रविवारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत वन विभाग, पोलिस प्रशासन, महसूल विभाग, अग्निशामक दल, ग्रामस्थ यांचे प्रयत्न सुरू होते. त्यात त्यांना यश आले नाही. यामुळे सोमवारी ‘एनडीआरएफ’ पथकाला पाचारण करण्यात आले. सकाळी सातपासून सुरू असलेल्या शोधकार्याला दुपारी चारच्या सुमारास यश आले. भारंबा रोडवरील पुलापासून काही अंतरावर अजय भोई यांचा माती खाली दबलेला मृत्यदेह आढळला. ‘एनडीआरएफ’ व अग्निशामक दलाच्या जवानांनी भोई यांचा मृत्यदेह बाहेर काढला. पोस्टमार्टेम करून मृत्यदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला.

Advertisements

आपलं सरकार