Karnatak Political Drama : रमेशकुमार आजच विश्र्वास दर्शक ठराव घेतल्यावर ठाम, कुमारस्वामी राजीनामा देण्याच्या पवित्र्यात

Advertisements
Advertisements
Spread the love

कर्नाटकमधील राजकीय कोंडी अद्याप फुटलेली नाही. विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावरील चर्चा आजही लांबली असून सभापती के. आर. रमेशकुमार यांनी या ठरावावर रात्रीचे १२ वाजले तरी आजच मतदान घेणार, असा पवित्रा घेतल्याने सत्ताधारी बाकांवरील चिंता वाढली आहे. दरम्यान, बहुमतासाठी आवश्यक संख्याबळ पाठिशी नसल्याने मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी कोणत्याही क्षणी आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात, अशीही चर्चा आहे.

Advertisements

कर्नाटक विधानसभेतील सत्तानाट्य आज मध्यरात्रीपर्यंत संपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विश्वासदर्शक ठरावावरील चर्चा लांबवली जात असल्याचे ध्यानात घेऊन सभापती रमेश यांनी मुख्यमंत्री कुमारस्वामी, उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर, काँग्रेस नेते सिद्धरामय्या, कृष्णा गौडा यांच्यासोबत बैठक घेऊन आजच सभागृहात विश्वासदर्शक ठरावावर मतदान व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याचवेळी आज रात्री १२ वाजेपर्यंत सभागृह चालवण्यास मी तयार आहे, असेही रमेश यांनी नमूद केले. सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे आहे. मला बळीचा बकरा करू नका, असेही रमेश यांनी बजावले. मात्र, त्यानंतरही सभागृहातील चर्चेचं गुऱ्हाळ थांबलेलं नाही. सत्ताधारी सदस्य ‘संविधान बचाव’च्या घोषणा देत विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेण्यास विरोध करत आहेत.

Advertisements
Advertisements

बी. एस. येडियुरप्पा यांनी आजच विश्वासदर्शक ठरावावर मतदान घ्यावे, अशी मागणी सभापतींकडे केली. आजच विश्वासदर्शक ठरावावर मतदान पूर्ण होईल व आम्ही बहुमत सिद्ध करू, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला होता. प्रत्यक्षात मात्र तशा कोणत्याच हालचाली दिसत नसल्यावर येडियुरप्पा यांनी बोट ठेवलं. त्यावर सत्ताधारी सदस्यांनी आक्षेप घेत गदारोळ केला.

दरम्यान, मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी आपल्या बाकावर राजीनामा तयार ठेवला असून ते कोणत्याही क्षणी आपल्या पदाचा राजीनामा देतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

आपलं सरकार