Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मुंबई: MTNLच्या इमारतीत आग; १०० कर्मचारी अडकले

Spread the love

आतापर्यंत ६० कर्मचाऱ्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले आहे. खबरदारी म्हणून बाजूची अंजुमन-ए-इस्लाम शाळाही रिकामी करण्यात आली आहे.

 

 

वांद्रे येथील एमटीएनएलची इमारत ९ मजली असून इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आगीचा धूर इमारतीच्या नवव्या मजल्यापर्यंत पसरला असून घाबरलेले कर्मचारी जीव मुठीत घेऊन वाचविण्यासाठी इमारतीच्या गच्चीवर गेले आहेत.त्यामुळे एमटीएनएल इमारतीच्या गच्चीवर १०० जण अडकल्याची शक्यता असून अग्निशमन दलाचे जवान त्यांना सुखरुप बाहेर काढत आहेत तर या आगीच्या घटनेत अडकलेले काही कर्मचारी तोंडाला रुमाल बांधून आगीच्या धुरापासून बचाव करत आहेत. दरम्कायान काही कर्मचारी खिडकीजवळ येऊन वाचवा वाचवा अशा हाका मारत आहेत. तर अग्निशमन दलाचे जवान शिडीच्या मदतीने अडकलेल्यांना वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

दुपारी ३ च्या सुमारास आग लागली असून वरच्या मजल्यांवर मोठ्या प्रमाणात कर्मचारी अडकले आहेत. आठव्या मजल्यावर अडकलेले कर्मचारी सध्या टेरेसवर सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले.

> अग्निशमन दलाच्या जवानांनी आतापर्यंत १५ जणांना सुखरूपपणे टेरेसवरून उतरवले आहे.

> एमटीएनल इमारतीजवळच अग्निशमन केंद्र असल्याने आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने मदत व बचावकार्य सुरू केले.

> किमान दोन मजल्यांवर आग भडकली असल्याने वांद्रे परिसरात धुराचे प्रचंड लोळ उठले आहेत. वांद्रे स्टेशनपर्यंत धुराचे साम्राज्य पसरले आहे.

> आगीच्या घटनेनंतर एस. व्ही. रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!