Aurangabad : महिलांच्या संरक्षणासाठी कमांडो पथकात तरुणींचा समावेश : पोलीस उपायुक्त मीना मकवाना

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंंंगाबाद : महिलांच्या प्रश्नावर आवश्यक तेथे मदत घेण्यासाठी महिला कमांडोंचा सहभाग, मदत पोलिसांच्या पथकात घेतली जाणार असल्याची माहिती नवनियुक्त पोलीस उपायुक्त मीना मकवाना यांनी सोमवारी (दि.२२) प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना दिली.

Advertisements

मुंबईतून येथे उपायुक्त म्हणून बदलीहून आलेल्या मीना मकवाना यांनी सोमवारी पदाची सूत्रे स्वीकारली. मुंबईत त्यांच्याकडे प्रमुख नेते, मंत्र्यांची दौNयातील सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी होती. येथील उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांची येथेच नागरी संरक्षण विभागाच्या अधीक्षकपदी बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी मीना मकवाना या येथे रुजू झाल्या असून शहरात यापूर्वी कामाचा अनुभव असल्यामुळे काही संकल्पना राबवण्याचे सूतोवाच त्यांनी माध्यमांशी बोलताना केले. २००३ सालच्या अधिकारी असलेल्या उपायुक्त मकवाना यांनी यापूर्वी खोकडपुNयातील सामाजिक न्याय भवनमध्ये जात वैधता प्रमाणपत्र विभागात कामकाज केलेले आहे.

Advertisements
Advertisements

पोलीस सेवेची सुरुवात त्यांनी मुंबईतून उपनिरीक्षकपदापासून केली असून त्यानंतर त्यांनी औरंगाबादेतही काही वर्षे सेवा केलेली आहे. सेवेत असतानाच त्यांनी औरंगाबादमधील एमपी लॉ कॉलेजमधून विधिची पदवी प्राप्त केलेली आहे. त्यामुळे शहराचा अभ्यास असल्यामुळे येथे अनेक नवनवीन संकल्पना राबवण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांच्या समस्यांसंदर्भाने पोलीस विभागात काही महिलांना कमांडो म्हणून घेतले जाणार असल्याचे त्या म्हणाल्या.

आपलं सरकार