Aurangabad : “जय श्रीराम ” वाद प्रकरणात कायदा हातात घेणा-यांची गय करणार नाही – पोलिस आयुक्त प्रसाद

Spread the love

जय श्रीरामच्या  वादातून आझाद चौकात तणाव , पोलिसांच्या वाहनावर दगडफेक

औरंंंगाबादच्या सिडकोतील आझाद चौकात रविवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास  मोठा जमाव जमल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली होती. जबरदस्तीने जय श्रीराम म्हणायला लावून मारहाण केल्याची तक्रार येताच हा प्रकार घडला. यावेळी संतप्त जमावाने पोलिसांच्या वाहनांवर दगडकफेकही केली होती. दरम्यान, शहरातील शांतता बिघडवून कायदा हातात घेणा-यांची कोणत्याही परिस्थितीत गय करणार नसल्याचे प्रतिपादन पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी सोमवारी (दि.२२) केले. तसेच आझाद चौकातील घटनेनंतर शहराच्या विविध भागात पोलिसांची गस्त वाढविण्यात आली असून रात्री उशिरापर्यंत टवाळखोरी करत फिरणाNयावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

हडको कॉर्नर भागात एका युवकाला रात्री अडवून जय श्रीराम म्हणण्याची सक्ती करत मारहाण केल्याची तक्रार होऊन दोन दिवस उलटले नाही तोच रविवारी रात्री सिडको भागातील आजाद चौकात अशाच प्रकारची घटना घडल्याची तक्रार समोर आली. त्यानंतर या भागात युवकांचा मोठा जमाव जमा झाला. याची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी पोहोचला. संतप्त जमाव कोणाचेही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. त्यांनी पोलिसांच्या गाड्यांवरही दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, उपायुक्त डॉ. राहूल खाडे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

या प्रकरणी सोमवारी शेख आमेर शेख अकबर (रा.कटकट गेट) या तरुणाने दिलेल्या तक्रारीवरून कारचालकासह इतर दोन-तीन अज्ञातांविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्रीच पोलिसांनी या भागातील सीसीटीव्ही फुटेज काढून तपासणी केली.

शहरभर दररोज नाकाबंदी

रात्रीच्या वेळी युवकांना अडवून मारहाण करण्याचे प्रकार वाढले आहे. मारहाणीच्या घटनांना नंतर धार्मिक रंग दिला जात असल्याने शहरातील शांतता भंग होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे रात्री ९ ते १२ या काळात दररोज नाकाबंद करण्याचा निर्णय पोलीस आयुक्तांनी घेतला आहे. तसेच रात्री ११ नंतर दुकाने चालू ठेवणा-यांवरही कठोर कारवाई केली जणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.

सोशल मिडीयावर बेजबाबदार  पोस्ट टाकणारांविरुद्ध कारवाई

किरकोळ वादाच्या घटनेला मॉब लिंचिंग, दंगल असे दाखविण्याचा प्रकार सोशल मिडियाच्या माध्यमातून होत असल्याने वारंवार दिसून येत आहे. रविवारच्या घटनेचेही काही व्हिडीओ सोशल मिडीयावर टाकून वातारवण बिघडविण्याचा प्रयत्न झाला. अशा बेजबाबदार लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची भूमिका पोलीस आयुक्तांनी घेतली आहे. सायबर विभागामार्फत असे व्हिडीओ, कॉमेन्ट टाकणा-  या लोकांचा शोध घेतला जात असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे प्रसाद यांनी सांगितले.तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही केले आहे.

धार्मिक रंग देणा-याविरूध्द करवाई करा-जलील

घटनेनंतर एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तीयाज जलील यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि शहरातील परिस्थितीबाबत चर्चा केली. त्यानंतर बोलताना खा.जलील म्हणाले की, रविवारची घटना मॉब लिंचिंगचा प्रकार नसून  या घटनेला काही जणांनी  दोन्ही बाजुंनी धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. येणा-या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन जाती-धर्माचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न काही गटांकडून केला जात आहे. आझाद चौकात जमलेल्या युवकांमध्ये बरेचजण नशा करणारे होते. या भागात ड्रग्ज माफिया सक्रीय असल्याने असे प्रकार वाढत आहेत. या माफियांसह वादाला वेगळे वळण लावणा-याविरूध्द कठोर कारवाई करण्याची मागणी पोलीस आयुक्तांकडे केल्याचे खा. जलील यांनी यावेळी सांगितले.

जमीयत-उलेमा-ए-हिंदने केले शांततेचे आवाहन

हडको कॉर्नर आणि आझाद चौकात झालेल्या दोन वादाच्या घटनानंतर सोमवारी (दि.२२) जमाते उलेमा ए हिंद या संघटनेच्या पदाधिकाNयांनी पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांची भेट घेतली. शहरात गेल्या काही दिवसापासून काही समाजवंâटकाकडून शहरातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला जात असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मराठवाडा उपाध्यक्ष तथा शहराध्यक्ष हाफीज अब्दुल अजीम, उपाध्यक्ष मुफ्ती अथर, सचिव हाफीज वैâसर खान, उपसचिव शोहेब कासमी आदींनी दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. तसेच शहरवासीयांनी कोणत्याही अफवेला बळी न पडता शांतता ठेववी असे आवाहनही यावेळी जमाते उलेमा ए हिंद संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

आपलं सरकार