It seems you're using an unsafe, out-of-date browser. CLOSE(X)

Aurangabad : आझाद चौकातील जय श्रीराम प्रकरण, “त्या” चौघा युवकांची हर्सुल कारागृहात रवानगी

Spread the love

औरंंंगाबाद : झोमॅटोच्या डिलेव्हरी बॉय असलेल्या तरूणाला रस्त्यात अडवून जबरदस्तीने जय श्रीराम म्हणण्यास भाग पाडल्याचा आरोप असलेल्या चार जणांना सिडको पोलिसांनी सोमवारी (दि.२२) पहाटे साडेपाच वाजता अटक केली. अटक केलेल्या चौघांना न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप साईनाथ औताडे (वय २५, रा.हर्सुल गाव, पिसादेवी रोड), सुनील परमेश्वर घाटुळ (वय २४), अक्षय नवनाथ लावंड (वय २३), ) ऋषिकेश अंकुशराव पोले (वय २१) सर्व रा. नारायणी हॉस्पीटलच्या पाठीमागे, सिडको एन-६ यांचा रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास झोमॅटोचे डिलेव्हरी बॉय सोबत वाद झाला होता. त्यावेळी या चौघांनी शेख आमेर शेख अकबर (वय २३, रा.नेहरूनगर,कटकटगेट), शेख नासेर शेख निजामोद्दीन (रा.कटकटगेट) यांना बळजबरीने जय श्रीराम म्हणण्यास सांगितले होते. परंतु शेख आमेर व शेख नासेर यांनी जय श्रीराम म्हणण्यास नकार दिला होता. त्यावेळी कारमधून  आलेल्या चौघांनी दोघांना शिवीगाळ करून मारहाण केली होती.

याप्रकरणी शेख आमेर शेख अकबर याच्या तक्रारीवरून सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास सिडको पोलिसांनी संदीप औताडे, सुनील घाटुळ, अक्षय लावंड, ऋषिकेश पोले यांना अटक केली होती.

पूर्ववैमनस्यातून पतीचे डोके फोडले

औरंंंगाबाद : विभक्त राहत असलेल्या पतीने मोबाईल क्रमांक मागीतल्याचा राग अनावर झाल्याने २५ वर्षीय विवाहितेने आपल्या पतीस मारहाण करून त्याचे डोके फोडले. ही घटना २० जुलै रोजी सायंकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास हडको एन-१२ परिसरातील गोदावरी शाळेजवळ घडली. याप्रकरणी मिलिंद सर्जेराव कोरके (वय २८, रा.स्वामी विवेकानंदनगर, हडको) यांनी दिलेल्या तक्रारीवरून मारहाण करणाNया पत्नीविरूध्द सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जमादार सिरसाट करीत आहेत.