Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Pakistan : इम्रानखान यांच्या स्वागताला फक्त पाकिस्तानी , तरीही डगमगले नाही इम्रान खान

Spread the love

अमेरिकेच्या दौऱ्यावर निघालेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे अमेरिकेत योग्य प्रकारे स्वागत झाले नाही. अमेरिकेतील मंत्री तर दूरच, मात्र कुणी सरकारी अधिकारीही खान यांच्या स्वागतासाठी विमानतळावर हजर राहिला नाही. या मुळे पाकचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेश यांच्यासोबत इम्रान खान यांना मेट्रोनेच विमानतळावरून हॉटेलात जावे लागले. इम्रान खान यांची अशी मानहानी झाल्यानंतर त्यांना ट्विटरवर इम्रान खान अमेरिकेत पोहोचल्यानंतर पीटीआयच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला. यावर अनेकांनी प्रतिक्रिया नोंदवल्या. काहींनी हा पंतप्रधानांचा अपमान असल्याचे म्हटले, तर काहींनी हा वर्ल्डकपमधील पराभवाचा बदला असल्याचे म्हटले आहे. एखाद्या सर्वसामान्य प्रवाशाप्रमाणे खान विमानातून बाहेर येत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

उमर अब्दुल्लांनी केली प्रशंसा

पाक पंतप्रधानांना ट्रोल केल्याचे पाहून उमर अब्दल्ला यांनी अमेरिकेवर निशाणा साधला. इम्रान खान यांनी आपल्या देशाचा पैसा वाचवला. बहुतेक नेत्यांसारखे ते आपल्या सोबत अहंकार घेऊन जात नाहीत. ती वाईट गोष्ट का आहे याची त्यांनी मला पुन्हा एकदा आठवण करून दिली. यामुळे हा आघात इम्रान खान यांच्यावर नसून तो अमेरिकेच्या सत्तेवरील आघात आहे, असे अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.

इम्रान खान सोमवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. या दरम्यान ते संरक्षण, व्यापार आणि कर्जासारख्या विषयांवर चर्चा करणार आहेत. सोमवारी हे दोन नेते सहभोजनही करणार आहेत.  दरम्यान, अमेरिकेत खान यांच्या स्वागतासाठी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांच्यासह पाकिस्तानी मूळ असलेल्या अमेरिकी नागरिकांनीही इम्रान खान यांचे स्वागत केले

आपलं सरकार

Click to listen highlighted text!