Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भाजपाची राज्यभरात महाजनादेश यात्रा

Spread the love

एकीकडे शिवसेनेने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जनआशीर्वाद यात्रा सुरू केली आहे. त्यापार्श्वभूमीवर भाजपानेही मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी महाजनादेश यात्रा काढण्याचे निश्चित केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाजनादेश यात्रा निघणार आहे.

संपूर्ण ऑगस्ट महिन्यात राज्यभर भाजपाची महाजनादेश यात्रा निघणार आहे. 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान राज्यभरात भाजपाची महाजनादेश यात्रा निघेल. तर दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही महाजनादेश यात्रा काढणार आहेत. 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यानच्या या यात्रेत मुख्यमंत्री राज्यातील विविध भागांना भेट देतील. तसेच सरकारने राबवलेल्या योजनांची माहितीही मुख्यमंत्री मतदारांना देणार आहेत.

भाजपाकडून एकीकडे संघटनात्मक पातळीवर इतर पक्षातील नेत्यांचे पक्षप्रवेश, बैठका, कार्यकर्त्यांशी संवाद या माध्यमातून पक्षाचा पाया भक्कम करण्याचे काम सुरू आहे. तर, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आखाड्यात उतरणार आहेत.  विधानसभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. लोकसभा निवडणुकीची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीतही करण्यासाठी भाजपाने कंबर कसल्याचं दिसतंय.

मुंबईत भाजपने विशेष कार्यसमितीच्या बैठकीच्या निमित्ताने मोठं शक्तीप्रदर्शन केलं आहे. मात्र, या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या नावाचीच जोरदार चर्चा घडवून आणल्याचं पाहायला मिळालं. या बैठकीच्या ठिकाणी सगळीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोसह ‘मी पुन्हा येतोय’, असं सांगणारे फलक झळकले होते. त्यामुळे सरकारचा चेहरा म्हणून मुख्यमंत्री हा ब्रॅण्ड पुन्हा एस्टॅब्लिश झाल्याचं यावेळी पाहायला मिळालं. त्यातच आता भाजपनं आगामी विधानसभा निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू केली असून खुद्द मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेची घोषणा केली आहे. एकीकडे आदित्य ठाकरे संभावित मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर जन आशीर्वाद यात्रा काढत असतानाच आता स्वत: मुख्यमंत्रीच महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने ‘पुन्हा मुख्यमंत्रीपदा’वरच शिक्कामोर्तब करण्यासाठी प्रयत्न करत आहेत की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. येत्या १ ऑगस्टपासून मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला सुरुवात होणार आहे. या यात्रेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच भाजपचे राज्यातील महत्त्वाचे नेते देखील उपस्थित असणार असल्याचं समजतंय.

  • १ ऑगस्टपासून मोझरीतून यात्रेला सुरुवात
  • पहिला टप्पा – मोझरी ते नंदुरबार
  • दुसरा टप्पा – अकोले, अहमदनगर, नाशिक
  • २५ दिवस चालणार यात्रा
  • मुंबई वगळता ग्रामीण भागात यात्रा निघणार
  • ३० जिल्ह्यांतून यात्रा जाणार
  • यात १५२ विधानसभा क्षेत्रांचा समावेश
  • ४ हजार ५०० किलोमीटरहून अधिक अंतराचा प्रवास
  • यात्रेदरम्यान ३०० हून अधिक सभा होणार
  • एकूण १०४ जाहीर सभा, २२८ स्वागत सभा आणि त्यादरम्यान रथावरूनच १० मिनिटांच्या मार्गदर्शन सभा.
  • काही मोठ्या विजय संकल्प सभांचाही समावेश
  • रथामधून यात्रा होणार असून यात व्यासपीठ, माईक, एलसीडी अशी अद्ययावत यंत्रणादेखील असेल
  • प्रत्येक ठिकाणी पत्रकार परिषद होईल
  • नाशिक तीर्थ क्षेत्रावर या यात्रेचा समारोप होईल

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!