Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : विवाहितेला ब्लॅकमेल करून अत्याचार , आरोपी पोलीस कोठडीत

Spread the love

बदनामी करून पती व मुलांना जिवे मारण्याची धमकी देत नातेवाईक विवाहितेवर २०१५ ते २०१८पर्यंत वारंवार अत्याचार करणाऱ्या आरोपीला शनिवारी दुपारी पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. एम. माने यांनी दिले. धीरेंद्र दत्तात्रय पुरी (२७, रा. एन-६, मथुरानगर) असे आरोपीचे नाव आहे.

या प्रकरणात ३० वर्षीय विवाहीतेने तक्रार दिली. २०१५ मध्ये पीडितेच्या पतीचा नातेवाईक आरोपी धीरेंद्र पुरी याच्याशी ओळख झाली होती. ओळखीचे रुपांतर पुढे मैत्रीत झाले. त्यामुळे आरोपी पीडितेला वारंवार फोन करायचा व शरीर सुखाची मागणी करायचा. मात्र, पीडिता त्याला नकार देत होती. २२ जुलै २०१५ रोजी आरोपीने पीडितेला फोन करून तुझा पती त्याच्या मैत्रिणीला घेवून माझ्या घरी अल्याची बतावणी केली. त्यामुळे पीडिता आरोपीच्या घरी गेली असता आरोपीने तिला मारहाण करीत तुझी रेकॉर्डिंग तुझ्या पतीला ऐकवतो, अशी धमकी देत अत्याचार केला. त्यानंतर आरोपीने पीडितेला वारंवार फोन करून फोन रेकॉर्डिंग तुझ्या पतीला पाठवतो, तुझी बदनामी करतो व पती व मुलांना जीवे मारतो अशी धमकी देत पीडितेवर तीन वर्ष वारंवार अत्याचार केला. या प्रकरणात सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपीला न्यायालयात हजर केले असता सहाय्यक सरकारी वकील एस. आर. ढोकरट यांनी आरोपीची वैद्यकीय तपासणी करणे असून आरोपीचा मोबाइल हस्तगत करणे आहे. गुन्हा करते वेळी आरोपीने परिधान केलेले कपडे जप्त करणे असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली. ही विनंती मान्य करून न्यायालयाने आरोपीला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!