Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

विदर्भ दौरा करून वंचितचे संसदीय मंडळ आजपासून मराठवाड्यात , इच्छुकांच्या मुलाखतीला उस्मानाबादेतून प्रारंभ

Spread the love

विदर्भातील वंचित बहुजन आघाडीकडून आमदारकी लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे विशेष पथक आजपासून मराठवाडा दौऱ्यावर येत आहे . वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनानुसार पक्षातर्फे २८८ जग लढविण्याच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीचे संसदीय मंडळ इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत आहे .

या मंडळात ऍड . अण्णाराव पाटील , अशोक सोनावणे , रेखा ठाकूर यांचा समावेश आहे. मराठवाड्यातील त्यांच्या या दौऱ्याला आज उस्मानाबादपासून सुरुवात होत आहे. हा दौरा पुढील प्रमाणे दि. २१ उस्मानाबाद , दि. २२ बीड, २३ लातूर,  २४ नांदेड ,  २५ हिंगोली ,  २६ परभणी , २७ औरंगाबाद , २८ जालना नियोजित दिवशी सकाळी दहा वाजता त्या त्या जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघातील मुलाखती घेण्यात येणास असल्याचे कळविण्यात आले आहे.

लोकसभेत वंचित बहुजन आघाडीला झालेले मतदान लक्षात घेता विधानसभा निवडणूक लढविण्यास अनेक उमेदवार गर्दी करीत आहेत तर वंचित कडून लढू इच्छिणारे उमेदवार त्यांच्या पक्षकाडून उमेदवारी न मिळाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर डोळा ठेवून आहेत . तर काही जण थेट प्रकाश आंबेडकर यांच्या सम्पर्कात आहेत. वंचित आणि काँग्रेस राष्ट्रवादी यांच्यात युती होईल कि नाही याची शास्वती देणे कठीण आहे . एका पत्रकार परिषदेत काँग्रेसला आमच्याकडून सोडण्यात येणार ४० जागांचा प्रस्ताव मंजूर असेल तर आमची युतीला हरकत नाही असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले होते मात्र त्यांच्या या विधानाला काँग्रेसने अद्याप गांभीर्याने घेतलेले नाही असे दिसत आहे . त्यामुळे लोकसभेप्रमाणेच वंचित बहुजन आघाडीचे राग रंग पाहता हि युती होणार नाही अशीच चर्चा अधिक आहे .

पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभा निवडणुकांतही वंचित आणि एमआयएमची आघाडी असल्याचे जाहीर केले असले तरी एमआयएम कडून नेमक्या किती आणि कोणत्या जागा मागितल्या जातील हे अद्याप ठरलेले नाही. खास करून एमआयएम मराठवाड्यातील महत्वाच्या जग मागण्याच्या तयारीत आहे परंतु त्यांची भूमिका अद्याप समजलेली नाही. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये  मात्र  सध्या तरी उत्साहाचे वातावरण आहे .

आपलं सरकार

Click to listen highlighted text!