Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महिला सुरक्षेच्या बाबतीत भारत जगात कितव्या क्रमांकावर ?

Spread the love

महिलांसाठी सर्वात सुरक्षित देशांच्या यादीत आइसलँडने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर, भारत या यादीत १०८ व्या स्थानी आहे. नॉर्वे आणि स्वीडन अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत. विशेष म्हणजे या यादीत पुढारलेल्या अमरिकेचा ५१ वा तर, इंग्लंडचा १५ वा क्रमांक आहे. वर्ल्ड इंडेक्स ट्विटरने ही आकडेवारी  प्रसिद्ध केली आहे.महिलांसाठी सुरक्षित असलेल्या यादीत भारत १०८ व्या स्थानीअसताना भारताचे शेजारी देश बांगलादेश ४८ व्या स्थानी, तर फिलिपीन्स हा देश ८ व्या स्थानी आहे. तर, या यादीत पाकिस्तान १४८ व्या स्थानी आहे.

हाँगकाँगमध्ये एकून कैद्यांच्या २०. ५ टक्के महिला कैदी असल्याचे स्पष्ट होत आहे. यानुसार सर्वाधिक महिला कैदी असलेल्या देशांच्या यादीत हाँगकाँग प्रथम स्थानी आहे. या यादीत भारत १२ व्या स्थानी आहे. भारतात हे प्रमाण ४.३ टक्के इतके आहे. पाकिस्तान मात्र १४ स्थानी असून तेथील महिला कैद्यांचे प्रमाण आहे १.७ टक्के.

आफ्रिका खंडातील रवांडा या देशात संसदेत सर्वाधिक महिला प्रतिनिधी असल्याचे स्पष्ट होत आहे. रवांडात संसदेतील महिला प्रतिनिधींचे प्रमाण आहे ६१ टक्के. यात बोलिव्हिया दुसऱ्या, तर क्युबा तिसऱ्या स्थानी आहे. भारताचा क्रमांक १४ वा असून भारतात ११ टक्के महिला संसदेत आहेत. पाकिस्तानचा क्रमांक भारताच्या वर असून पाकिस्तानात २० टक्के महिलांना प्रतिनिधीत्व मिळाले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!