Pune : सहलीवरुन परतणारे ९ विद्यार्थी ट्रक-कार अपघातात जागीच ठार

Advertisements
Advertisements
Spread the love

लोनी काळभोर वाक वस्ती येथे ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात कारमधील ९ महाविद्यालयीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कारमधील प्रवासी हे यवत येथील रहिवासी होते. हे सर्वजण रायगडला सहलीला गेले होते. सहलीवरून घरी परतत असताना लोणी काळभोर येथे काळाने या तरुणांवर झडप घातली.

Advertisements

पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास इर्टीका कार ही यवतच्या दिशेने जात होती. लोनी काळभोर वाक वस्ती येथे कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या मधील दुभाजकावरून पलीकडच्या मार्गावर कार गेली. त्याच वेळेस शहराच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने कारला जोरात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, ट्रकने कारला सुमारे शंभर फूट फरफटत नेले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर कारमधील मृतदेह बाहेर काढणे अडचणीचे झाले होते. यामधील सर्व मृतदेह ही यवत परिसरातील रहिवासी आहेत. सर्वांना लोणी पोलिसांनी ससून हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले असल्याची माहिती लोणी काळभोरचे सहायक पोलिस निरीक्षक राजू महानोर यांनी दिली.

Advertisements
Advertisements

अपघातात मृत झालेल्यांची नावे

शुभम रामदास भिसे (वय १९)
विशाल सुभाष यादव ( वय २०)
निखिल चंद्रकांत वाबळे (वय २०)
अक्षय चंद्रकांत शिगे ( वय २०)
ऋषिकेश गणेश यादव ( वय २०)
अक्षय भरत वायकर ( वय २२)
नूरमोहम्मद आबास दाया ( वय २२)
परवेज अशपाक आतार ( वय २१)
जुबेर अजीज मुलाणी (वय २१)

मृतांमधील दत्ता गणेश यादव हा हडपसर ( उंड्री) भागातील JSPMS महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. निखिल चंद्रकांत वाबळे हा विश्वराज हॉस्पिटलमध्ये बाऊन्सरचे काम करायचाय तर विशाल सुभाष यादव हा वाघोली गावातील JSPMS महाविद्यालयात शिकत होता. शुभम भिसे हा उरळी कांचन जवळील कासुर्डी गावातील महात्मा गांधी महाविद्यालयात BCS चे शिक्षण घेत होता तर अक्षय चंद्रकांत दिघे हा हडपसरमधील अण्णासाहेब मगर महाविद्यालयात BSC च्या शेवटच्या वर्षाला होता.

नुरमोहम्मद दारा हा लोणी काळभोर मधील महाविद्यालयात बी एच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. परवेज अशपाक आत्तार आझम कॅपसमधील पुणा कॉलेजमधे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. अक्षय वायकरचा स्वत:चा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत होता तर जुबेर मुलाणी हा लोणी काळभोर जवळ नोकरी करत होता.

आपलं सरकार